अदानीसाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम धाब्यावर; धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवनारची जागा देण्याचा राज्य, महापालिकेचा निर्णय

अदानीसाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम धाब्यावर; धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवनारची जागा देण्याचा राज्य, महापालिकेचा निर्णय

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार बंद करण्यात आलेल्या डम्पिंग ग्राऊंडवर पुढील 15 वर्षे कोणतेही बांधकाम करता येत नाही, मात्र अदानीच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवनार डम्पिंग ग्राऊंडची जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला असून केंद्रीय प्रदूषण मंडळाचे हे नियम राज्य आणि महापालिकेने पायदळी तुडवले आहेत. याबाबत राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला सामाजिक कार्यकर्ते अॅड. सागर देवरे यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून मुंबईतील मोक्याच्या जागा हडपण्याचा प्रयत्न अदानी समूहाकडून करण्यात येत आहे. यात देवनार डम्पिंग आणि मुलुंड डम्पिंग ग्राऊंडचा समावेश असून ही जागा राज्य सरकार आणि मुंबई महापालिका अदानीला देणार आहे. डम्पिंग ग्राऊंडची ही जागा हजारो कोटी रुपये खर्च करून राहण्याजोगी करण्यासाठी मुंबई महापालिकेने निविदा काढली आहे. देवनारबरोबर  मुलुंड डम्पिंग ग्राऊंडसुद्धा याच प्रकल्पाला देण्याचा घाट घातला जात असून त्याचीही प्रक्रिया सुरू आहे, असा आरोप देवरे यांनी केला आहे.

डम्पिंग ग्राऊंड अदानीला देण्याचा निर्णय रद्द करा!

राज्य सरकार आणि मुंबई महापालिका आयुक्तांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे पालन करत देवनार डम्पिंग ग्राऊंड धारावी प्रकल्पाला देण्याचा निर्णय तातडीने रद्द करावा तसेच मुलुंड आणि देवनार डम्पिंग ग्राऊंडवर पुढील 15 वर्षे कोणत्याही प्रकारच्या बांधकामाला मनाई करावी. त्याचबरोबर डम्पिंग ग्राऊंडच्या 500 मीटरचा परिसर बफर झोन म्हणून जाहीर करावा, मुलुंड डम्पिंग ग्राऊंड येथे बिल्डरधार्जिणे गोल्फ कोर्स न करता न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कच्या धर्तीवर सेंट्रल पार्क उभारावे, अशी मागणी सागर देवरे यांनी राज्य आणि मुंबई महापालिकेकडे केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;