22 कोटींच्या हिऱ्यांचा अपहार; तिघांना अटक
22 कोटींच्या हिऱयांचा अपहार करून हिरे व्यावसायिकाची फसवणूक करणाऱया तिघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. हेमंत शहा, कौशल कदम, आणि शकील अहमद मोहंमद शेख या तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.
तक्रारदार यांची हिरे कंपनी आहे. त्या कंपनीचे कार्यालयात बीकेसी येथे आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी हिरेजडित दागिन्यांच्या विक्रीसाठी गोरेगावच्या नेसको येथील प्रदर्शनात भाग घेतला होता. तेव्हा दोघांनी त्यांना पह्न केला. त्यानंतर ते दोघे त्यांच्या कार्यालयात आले. त्यांनी हिऱयांचा व्यवसाय सुरू करण्याबाबत चर्चा केली. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदार यांनी त्यांना काही हिरे दिले होते. हिऱयांचे उर्वरित 22 कोटी रुपये त्यांनी दिले नव्हते. त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर देखील बंद करून ठेवला होता. घडल्याप्रकरणी त्यांनी खार पोलीस ठाण्यात धाव घेतली. खार पोलिसांनी गुन्हा नोंद करून तो पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List