प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलाला जीवेमारण्यासाठी 2 लाखांची सुपारी! पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
Bollywood: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडकरांना धमकीचे फोन आणि मेसेज येत आहेत. त्यामुळे पोलीस देखील सतर्क झाले आहे. अभिनेता सलमान खान याच्यानंतर आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलाला जीवेमारण्याची धमकी मिळाली असून त्यासाठी 2 लाख रुपयांची सुपारी दिल्याची माहिती देखील समोर आली. पण पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे, शिवाय याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे.
ज्या अभिनेत्याच्या मुलाला धमकी मिळाली आहे, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून जॅकी श्रॉफ आहेत. जॅकी श्रॉफ यांचा मुलगा आणि अभिनेता टायगर श्रॉफ याला जीवेमारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर येताच पोलिसांनी तपास सुरु केला. तपासात पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली आहे.
टायगर श्रॉफला जिवे मारण्यासाठी 2 लाख रुपये देण्यात आल्याची खोटी माहिती पसरवणाऱ्या व्यक्ती विरोधात खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मनीषकुमार सुजींदर सिंग असं या आरोपीचे नाव असून तो मूळचा पंजाबचा आहे. त्याचं वय 35 वर्ष आहे.
मनीषने सोमवारी मुंबई पोलिसांच्या पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून ट्रिग या सुरक्षा कंपनीचे काही लोकं अभिनेता टायगर श्रॉफला जिवे मारणार असल्याचं सांगितलं. एवढंच नाही तर अभिनेता टायगर याला मारण्यासाठी हत्यार व दोन लाखाची सुपारीही यांनी दिल्याचे आरोपी मनिषकुमारने नियंत्रण कक्षाला सांगितले.
धमकीच्या या फोननंतर सुरक्षायंत्रणा कामाला लागली. मात्र पोलिसांनी वस्तुस्थिती तपासल्यानंतर मनिषकुमारने खोटी माहिती नियंत्रण कक्षला दिल्याचे तपासात समोर आलं. या प्रकरणी खार पोलिसांनी मनिषकुमार सुजींदर सिंग विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
या पूर्वी अभिनेता सलमान खान याला यासारखे धमकीचे फोन नियंत्रण कक्षााला आले होते. सलमान खान याच्या वांद्रे तेथील घराबाहेर गोळीबार देखील करण्यात आला. या हल्ल्याची जबाबदारी गुंड लॉरेन्स बिष्णोई याने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वीकारली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List