‘मी सुद्धा लघवी पण प्यायली…’, परेश रावल यांच्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा
दिग्गज अभिनेते परेश रावल यांनी नुकताच दिलेल्या मुलाखतीत रुग्णालयात असताना लघवी प्यायली असल्याचा खुलासा केला. परेश रावल यांच्या गुडघ्यांना गंभीर दुखापत झाली होती आणि जखम बरी होण्यासाठी मोठा काळ लागणार होता, म्हणून लवकर बरं होण्यासाठी 15 दिवस सतत लघवी प्यायलो… असं वक्तव्य परेश रावल यांनी नुकताच झालेल्या मुलाखतीत केला. परेश रावल यांच्यानंतर आणखी एका अभिनेत्रीने लघवी प्यायल्याचा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्ची रंगली आहे.
लघवी प्यायल्याचा खुलासा ज्या अभिनेत्रीने केला आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री ‘आशिकी’ फेम अभिनेत्री अनू अग्रवाल आहे. मुलाखतीत अनू अग्रवाल म्हणाली, ‘हे फार कमी लोकांना माहिती आहे… ते अज्ञान असो किंवा जाणीवेचा अभाव असो, पण लघवी पिण्याला अमरोली असं म्हणतात, ते हठयोगातील एक आसन आहे. मी स्वतः त्याचा अभ्यास केला आहे. आम्ही सर्वांनी त्याचा वापर केला आहे आणि तो एक फार महत्त्वाचा अभ्यास आहे. पण लक्षत ठेवण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण लघवी प्यायची नाही.
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘लघवीतील काही भागच पिण्यासाठी लाभदायक असतो. त्वचेसाठी हे फार उपायकारक आहे. यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत. फक्त आरोग्यासाठीच नाही तर कल्याणासाठी फार आश्चर्यजनक आहे. मी स्वतःयाचे फायदे अनुभले आहेत.
मुलाखतीत अनू अग्रवाल हिला विज्ञान अशा पद्धतींना समर्थन देत नाही… असा प्रश्न देखील विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘विज्ञान किती जुनं आहे? जवळपास 200 वर्ष… पण योज 10 हजार वर्ष जुनं आहे. अशात तुम्ही कोणाच्या कार्यक्षमतेवर अधिक विश्वास ठेवाल? मी कायम योगचं समर्थन करते.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
काय म्हणाले होते परेश रावल
‘घायल’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान, परेश रावल यांना दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा विरू देवगन त्यांची विचारपुस करण्यासाठी रुग्णालयात आले. तेव्हा विरु देवगन यांनी परेश यांनी सकाळी लघवी पिण्याचा सल्ला दिला.
यावर परेश रावल म्हणाले, ‘देवगन सरांनी दिलेला सल्ला मी ऐकला. मी लघवी बियर समजून प्यायलो. कारण मला याचं पालन करायचं होतं. तर मी ठरवलं योग्य पद्धतीत करायचं. 15 दिवस मला सकाळी लघवी प्यायची होती. त्यानंतर प्रकृतीत झालेली सुधारणा पाहून डॉक्टर देखील चकित झाले होते…’ सध्या सर्वत्र परेश रावल यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List