पृथ्वी शॉ गर्लफ्रेंडसोबत ‘तो’ खास फोटो शेअर करत म्हणाला…, कोण आहे क्रिकेटपटूची गर्लफ्रेंड
Prithvi Shaw Girlfriend: भारतीय सलामीवीर पृथ्वी शॉ सध्या क्रिकेटपासून दूर आहे. यावेळी तो आयपीएलचा देखील भाग नाही. सांगायचं झालं तर, IPL 2025 च्या मेगा लिलावात पृथ्वी शॉला कोणत्यात संघाने बोली लावली नाह. त्याने त्याची मूळ किंमत 75 लाख रुपये ठेवली होती. पण सतत होणाऱ्या वाईट कामगिरीमुळे पृथ्वी शॉवर कोणी बोली लावली नाही. क्रिकेटमध्ये आता सक्रिय नसताना देखील पृथ्वी शॉ चर्चेत असतो.
पृथ्वी शॉ आता त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. पृथ्वीच्या आयुष्यात नव्या मुलीची एन्ट्री झाली आहे. पृथ्वीने मुलीचा वाढदिवस देखील मोठ्या थाटात साजरा केला आहे. पृथ्वीने गर्लफ्रेंडसोबत एक फोटो देखील शेअर केला आहे.
फोटोमध्ये पृथ्वी गर्लफ्रेंडला केक भरवताना दिसत आहे. तर गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पृथ्वी म्हणाला, ‘हॅप्पी बर्थडे आकृती अग्रवाल…’ एवढंच नाही तर, त्याने हार्ट इमोजी देखील शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर पृथ्वीचा फोटो तुफान व्हायरल होत आहे.
सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी पृथ्वीचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. ज्यामध्ये पृथ्वी एका ‘मिस्ट्री गर्ल’सोबत दिसला. तिचं नाव आकृती अग्रवाल आहे. आकृती अग्रवाल ही एक अभिनेत्री, फॅशन इन्फ्लुएन्सर आणि कंटेंट क्रिएटर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही एकमेकांना डेट करत आहेत.
कोण आहे आकृती अग्रवाल?
आकृती अग्रवालचा जन्म 2 मे 2003 रोजी नवाबांच्या शहरात, लखनऊ येथे झाला. ती आता मुंबईत राहते. आकृती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. तिचे इंस्टाग्रामवर 3.4 मिलियन पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. याशिवाय, आक्रितीचा एक यूट्यूब चॅनेल देखील आहे, ज्याचे 70 हजारहून अधिक सबस्क्राइबर आहेत. आकृती अग्रवाल तिच्या आगामी ‘त्रिमुखा’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.जो तिचा डेब्यू सिनेमा देखील असेल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List