धर्मेंद्र-शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणारा ‘हा’ अभिनेता आता करतोय चौकीदारी
बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमार एकदा म्हणाला होता, बॉलिवूडमधील प्रवास फार कठीण आहे. पण त्यापेक्षा कठीण गोष्ट म्हणजे बॉलिवूडमध्ये टिकणं आणि सतत काम मिळवणं… अनेक कलाकार असे आहेत ज्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आणि कालांतराने गायब झाले. असंच काही एका अभिनेत्यासोबत देखील झालं आहे. अभिनेत्याने अक्षय कुमार याच्यासोबत ‘आरंभम’ सिनेमात काम केलंय.
‘आरंभम’ सिनेमात अभिनेत्याने खलनायकाची भूमिका साकारली होती, जो दहशतवादी संघातील एक गुंड असतो. पण या अभिनेत्यावर आता अत्यंत वाईट वेळ आली आहे. एकेकाळी मोठ्या पडद्यावर झळकणारा अभिनेता आता चौकीदारी करून स्वतःची भूक भागवत आहे.
हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, सावी सिद्धू आहे. जो लखनऊ येथील आहे. वकिलीचा आभ्यास केल्यानंतर अभिनेत्याने रंगमंचावर पदार्पण केल. त्यानंतर मॉडेलिंगमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. सावी सिद्धू याला अभिनेता व्हायचं होतं आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभिनेता अखेर मुंबईच्या ट्रेनमध्ये बसला.
सावी सिद्धू याने 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ठाकड’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. सावी सिद्धू याचं सादरीकरण पाहून दिग्दर्शक अनुराग कश्यप देखील हैराण झाला. त्यानंतर सावी सिद्धू याला ‘पांच’ सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. पण काही कारणांमुळे सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही.
त्यानंतर सावी सिद्धू याने ‘ब्लैक फ्रायडे’, ‘कुलाल’, ‘पटियाला हाउस’; ‘डी-डे’, ‘नौथंगी चाला!’, ‘आरंभम’, बेवकूफियां’ आणि ‘मस्का’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. एवढंच नाही तर, सावी सिद्धू याने दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत देखील स्क्रिन शेअर केली आहे.
रिपोर्टनुसार, ‘बेवकूफियां’ सिनेमानंतर सावी सिद्धू हळू हळू गायब होऊ लागला. याच कारणामुळे अभिनेत्याला आर्थिक चणचण देखील भासू लागली. अशात 2019 मध्ये अभिनते लोखंडवाला येथील एका अपार्टमेंटमध्ये सिक्योरिटी गार्ड म्हणून काम करताना दिसला. अभिनेत्याला असं पाहिल्यानंतर सर्वांना मोठा धक्का बसला.
सावी सिद्धू एका मुलाखतीत त्याच्या परिस्थितीबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा अभिनेत्याच्या डोळ्यात पाणी आलं. अभिनेत्याने आई, पत्नी आणि सासूला देखील गमावलं होतं. ज्यामुळे अभिनेता आयुष्यात एकटाच राहिला. अचानक सावी सिद्धूच्या आयुष्यात मोठं वादळ आलं आणि सर्वकाही उद्ध्वस्त करुन गेलं. ज्यानंतर अभिनेत्याने स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 12 तास चौकादारी करण्याचं काम करण्यास सुरुवात केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List