गात असताना सोनू निगमला धमकी; म्हणाला, ‘पहलगाममध्ये हल्ला होण्याचं कारण हेच…’

गात असताना सोनू निगमला धमकी; म्हणाला, ‘पहलगाममध्ये हल्ला होण्याचं कारण हेच…’

Sonu Nigam Video: गायक सोनू निगम याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये गाणं गात असताना एक चाहता सोनू निगम याला वाईट प्रकारे धमकी देतो. ज्यामुळे संतापात सोनू निगम म्हणतो, ‘पहलगाममध्ये जे झालं आहे, त्यासाठी हेच कारण आहे… सध्या सर्वत्र गायकाच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. व्हिडीओ नेटकरी लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहे.

गायक सोनू निगम याने नुकताच बेंगळुरूमधील ईस्ट पॉइंट कॉलेजमध्ये झालेल्या एका कार्यक्रमा दरम्यान एका मुलाला फटकारलं आहे. कार्यक्रम सुरु असताना मुलाने गायला कन्नडमधील गाणं गा… असं धमकावत सांगितलं. यावर सोनू निगम याने देखील सडेतोड उत्तर दिलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Namma Bengaluru (@nammabengaluroo)

 

सोनू निगम म्हणाला, ‘संपूर्ण जगात कोणत्याही देशात गेल्यानंतर मी कायम म्हणतो कर्नाटकातील चाहत्यांवर माझं प्रेम आहे. 14 हजार लोकांमधून मला एका आवज कन्नड चाहत्याचा येतो आणि त्या एका चाहत्यासाठी मी कन्नड गाणं म्हणतो. मी तुमचा इतका आदर करतो. त्यामुळे तुम्ही देखील असं नाही करायला हवं… हेच कारण आहे पहलगाममध्ये जे काही झालं त्यासाठी… सध्या सोनू निगम याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

गायकाबद्दल सांगायचं झालं तर, सोनू निगम याला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. 1992 मध्ये प्रसारित झालेल्या ‘तलाश’ मालिकेतून सोनूने करीयरची सुरुवात केली. मालिकेतील ‘हम तो छैला बन गए’ गाण्याला चाहत्यांनी डोक्यावर देखील घेतलं. त्यानंतर सोनू निगम याने कधीच मागे वळून पाहिलं नाही.

बॉर्डर सिनेमातील संदेशे आते है, परदेस सिनेमातील ये दिल दिवाना यांसारखे अनेक हीट गाणी सोनू निगमने बॉलिवूडला दिले आहेत. हिंदी आणि कन्नड व्यतिरिक्त त्याने बंगाली, मराठी, तेलगू, तमिळ, उडिया, इंग्रजी, आसामी, मल्याळम, गुजराती, भोजपुरी, नेपाळी, तुलू, मैथिली आणि मणिपुरी भाषेतही गाणी गायली आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ऍपलची उत्पादने हिंदुस्थानात बनवू नका!अमेरिकेचेअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे टीम कूक यांना फर्मान, मोदींना झटका ऍपलची उत्पादने हिंदुस्थानात बनवू नका!अमेरिकेचेअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे टीम कूक यांना फर्मान, मोदींना झटका
हिंदुस्थान-पाकिस्तानमधील युद्धविरामाच्या ‘डील’नंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना झटका दिला आहे. ‘अॅपल’ची उत्पादने हिंदुस्थानात बनवू नका. हिंदुस्थानात...
लबाडांनो पाणी द्या!शिवसेनेचा आज छत्रपती संभाजीनगरात हल्लाबोल महामोर्चा,आदित्य ठाकरे करणार नेतृत्व
संजय राऊत यांच्या तुरुंगातल्या अनुभवांचे थरारक चित्रण,‘नरकातला स्वर्ग’चे उद्या प्रकाशन
विजय शाह यांचे विधान अक्षम्य, त्यांना मंत्रीपदावरून तत्काळ हटवा! कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबीयांचा संताप
आता चर्चा फक्त पाकव्याप्त कश्मीर ताब्यात घेण्यावरच होईल, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले स्पष्ट
सामना अग्रलेख – निर्लज्ज मंत्री; कोडगा पक्ष
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट