Chhatrapati Sambhaji Nagar News – लग्नाच्या जेवणातून विषबाधा; 8 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू, 500-600 वऱ्हाड्यांना उलट्या, जुलाबाचा त्रास

Chhatrapati Sambhaji Nagar News – लग्नाच्या जेवणातून विषबाधा; 8 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू, 500-600 वऱ्हाड्यांना उलट्या, जुलाबाचा त्रास

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील अंबाला येथे पार पडलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात जेवण केलेल्या 500 ते 600 जणांना विषबाधा झाली आहे. एकाचवेळी एवढ्या नागरिकांना मळमळ, उलट्या, जुलाबाचा त्रास झाल्याने खळबळ उडाली. यामध्ये एका 8 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली आहे. सुरेश गुलाब मधे (वय – 8, रा. महादेवखोरा, ता. कन्नड) असे मुलाचे नाव आहे. तर संगीता मेंगाळ (वय – 25) या महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबाला येथे शुक्रवार (25 एप्रिल) रोजी ठाकर समाजाच्या आठ जोडप्यांचा सामूहिक विवाह पार पडला. दुपारी साडे चारच्या सुमारास हा विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर पाचच्या सुमारास जेवणाच्या पंगती सुरू झाल्या. सामूहिक विवाह सोहळ्याला शेकडो लोक जेवण करून गेले.

शनिवारी दुपारच्या सुमारास लग्नात जेवलेल्यांना मळमळ, उलट्या, जुलाब अशी लक्षणे दिसू लागली. स्थानिक रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर अनेकांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दरम्यान, 8 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. लग्नाच्या जेवणातून विषबाधा झाल्याचे कळताच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह इतर वैद्यकीय पथकांनी रुग्णालयास भेट दिसून परिस्थितीचा आढावा घेतला आणि पुढील सूचना केल्या. विषबाधा नेमकी झाली कशी आणि दोषी कोण याचा तपास सध्या सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रस्त्यावरून फरफटत नेत महिलेवर बलात्कार, चाकण एमआयडीसीतील घटना रस्त्यावरून फरफटत नेत महिलेवर बलात्कार, चाकण एमआयडीसीतील घटना
कामावर निघालेल्या महिलेला अंधाराचा फायदा घेत रस्त्यावरून फरफटत निर्जनस्थळी नेत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री चाकणजवळील मेदनकरवाडी येथे...
चिंचवडमध्ये मेट्रोचा पिलर कोसळला, वर्दळ नसल्यामुळे अनर्थ टळला; नागरिक संतप्त
निवडणुका बॅलेट पेपरवरच व्हाव्यात! सरन्यायाधीशांची आई कमला गवई यांचे स्पष्ट मत
बलुचिस्तान स्वतंत्र, बलूच लिबरेशन आर्मीची घोषणा; शांती सेना पाठवण्याची संयुक्त राष्ट्रांना केली विनंती
आता चीनच्या कुरापती अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची नावे बदलली
पाकिस्तानच्या तावडीतून बीएसएफ जवानाची सुटका
शिवाजीनगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला 1 लाखाची लाच घेताना पकडले