शिवाजीनगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला 1 लाखाची लाच घेताना पकडले

शिवाजीनगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला 1 लाखाची लाच घेताना पकडले

एका डॉक्टरला अटक करताना आवश्यक प्रक्रिया न केल्याने वरळीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच गोवंडीच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बापूसाहेब देशमुख यांना एका ट्रस्टच्या सचिवाकडून 1 लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

निवृत्ती अवघ्या 15 दिवसांवर आली असताना बापूसाहेब देशमुख यांना पैशांची लालसा भोवली. बापूसाहेब देशमुख (57) असे त्या वरिष्ठ निरीक्षकाचे नाव आहे. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना देशमुख एक लाख घेताना ट्रॅप झाल्याने पोलीस दलातून संताप व्यक्त होत आहे. एका ट्रस्टच्या सचिवाने केलेल्या तक्रारीच्या आधारे देशमुखांवर ही कारवाई करण्यात आली. ऑगस्ट 2024 मध्ये काही व्यक्तींनी ट्रस्टच्या शाळेच्या गेटचे कुलूप तोडून कार्यालयात घुसखोरी केली व संस्थेवर बेकायदेशीर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. याविरोधात ट्रस्टच्या सचिवाने वरळी येथील धर्मादाय आयुक्त आणि शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

गेल्या महिन्याच्या 22 तारखेला या तक्रारीच्या अनुषंगाने सचिवाने बापूसाहेब देशमुख यांची भेट घेतली होती. त्यावेळी धर्मादाय आयुक्तांचा अंतिम निकाल येईपर्यंत विरोधकांना शाळेत प्रवेश न देण्यासाठी तसेच विरोधकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी देशमुख यांनी पाच लाखांची मागणी केली. त्यानंतर पाचऐवजी तीन लाख देण्यास देशमुख यांनी सांगितले. परंतु लाच द्यायची नसल्याने ट्रस्टच्या सचिवाने अ‍ॅण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार दिली. अखेर एक लाख रुपये लाचेचा पहिला हप्ता ट्रस्टच्या सचिवाकडून घेताना वरिष्ठ निरीक्षक बापूसाहेब देशमुख यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;