आयपीएल राऊंडअप – …तर इशानला मैदान सोडावे लागले नसते

आयपीएल राऊंडअप – …तर इशानला मैदान सोडावे लागले नसते

मुंबई विरुद्ध हैदराबाद सामन्यात इशान किशन विचित्र पद्धतीने बाद होण्याचा प्रकार अनेकांना खटकलाय.  हिंदुस्थानचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त करताना इशानने थोडा संयम बाळगायला हवा होता. त्याला मैदान सोडावे लागले नसते, असे परखड मत व्यक्त केले. डीआरएसचा पर्याय उपलब्ध असतानाही इशानचे डीआरएस न घेता मैदान सोडणे सर्वांना खटपू लागलेय. त्याने मैदानावरील पंचांवर निर्णय सोडायला हवा होता. कारण त्यांनाही त्यांच्या कामाचे पैसे दिले जातात, असेही सेहवाग म्हणाला.

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या 41 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज इशान किशनला बाद देण्याच्या निर्णयावरून वाद पेटला आहे. फलंदाजी करताना इशान पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता मैदानाबाहेर गेला. मुंबईचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने इशान किशनला लेग साईडवर एक चेंडू टाकला, जो बॅटच्या अगदी जवळून गेला. मात्र, मुंबईच्या खेळाडूंनी झेलबाद झाल्याबद्दल अपीलही केले नव्हते. मात्र, पंचांनी अर्धा हात वर केला. त्यानंतर चहरने अपील केल्यानंतर पंचांनी इशानला बाद घोषित केले. त्यानंतर इशानने आपला प्रामाणिकपणा दाखवत केलेला मूर्खपणा न पटणारा आहे. जर चेंडू बॅटला लागला असता तर ते समजण्यासारखे होते, कारण असे करणे खेळाच्या भावनेनुसार झाले असते. पण चेंडू लागला नसतानाही आणि पंचांना खात्री नसतानाही मैदान सोडून जाणे योग्य नव्हते, असे सेहवाग म्हणाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ऑपरेशन सिंदूरवर सिनेमा! पण काम सुरू होण्यापूर्वी दिग्दर्शकाने मागितली माफी, काय आहे कारण? ऑपरेशन सिंदूरवर सिनेमा! पण काम सुरू होण्यापूर्वी दिग्दर्शकाने मागितली माफी, काय आहे कारण?
भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरवर आधारित चित्रपटाच्या घोषणेच्या एका दिवसानंतर निर्मात्यांनी आता सोशल मीडियावरून पोस्टर हटवले आणि माफी मागितली आहे. शनिवारी,...
“तू बॉलिवूडमध्ये काम केलं याची लाज वाटते…” प्रसिद्ध अभिनेत्रीने फवाद खानला चांगलच फटकारलं
भारत-पाक तणावाच्या परिस्थितीनंतर या प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा निर्णय; कमाईचा एक हिस्सा देणार भारतीय सैन्याला
हिंदुस्थानचे S400 डिफेन्स सिस्टमही संपूर्णपणे सुरक्षित, कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाकिस्तानचा खोटेपणा केला उघड
मिंध्यांनंतर भाजपची भाईंदरमध्ये कंटेनर शाखा, महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानासमोरच फुटपाथ अडवला
कर्जतच्या ‘सुटकेस बॉडी’चे गूढ उकलले, 200 सीसीटीव्हीचा मागोवा घेत पोलिसांची मारेकऱ्यांवर झडप
हिंदुस्थाननं जिरवली, तरी पाकिस्तानला युद्धाची खुमखुमी; सैन्य LoC वर आणण्यास सुरुवात, परिस्थिती चिघळण्याचे संकेत