मखानापासून रोखू शकतो केस गळती, जाणून घ्या वापरण्याची सर्वोत्तम पद्धत

मखानापासून रोखू शकतो केस गळती, जाणून घ्या वापरण्याची सर्वोत्तम पद्धत

आजच्या घडीला प्रत्येक महिला ही केस गळण्याच्या समस्येला तोंड देत आहे. बाजारात उपलब्ध असलेले महागडे प्रॉडक्ट वापरून सुद्धा केस गळायचे थांबत नाही. त्याऐवजी अधिकचे केसांचे नुकसान होते. अशातच तुम्हीही केस गळतीच्या समस्येशी झुंजत असाल तर मखाना तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. हा घरगुती उपाय तुम्हाला केस गळण्याच्या समस्येपासून सुटका मिळेल. कारण मखान्यामध्ये प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात जे तुमचे केस मजबूत करण्यासाठी आणि केस गळती रोखण्यासाठी खूप फायदेशीररित्या काम करते. मखान्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने त्याचा केसांच्या वाढीवरही परिणाम होतो. केस मजबूत होतात. तसेच ते केसांना होणारे फ्री रॅडिकल्सचे नुकसानी पासून दूर ठेवते.

तुम्हाला माहिती आहे का की मखाना मिल्कशेक प्यायल्याने केस गळणे, त्वचेच्या समस्या, सूर्यप्रकाश आणि ताण, वृद्धत्व खूप कमी होते. जर तुम्हाला केस गळतीचा त्रास होत असेल तर मखाना थेट खाण्याव्यतिरिक्त तुम्ही ते तुमच्या केसांना देखील लावू शकता. खरं तर, मखानामध्ये लोह, मॅग्नेशियम, प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात. त्यात खूप कमी कॅलरीज असतात.तसेच यात फॅट आणि सोडियमचे प्रमाण नगण्य असते, जे त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे.

केसांची काळजी घेण्यासाठी मखाना दूध फायदेशीर

जर तुम्हालाही केसांच्या व त्वचेच्याअशा कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत असेल, तर मखाना शेकचा तुमच्या आहारात समाविष्ट करा. तुम्हाला निरोगी त्वचा आणि केसांची योग्य निगा राखायची असेल तर एक ग्लास मखाना शेक तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. तसेच हा मखाना शेक पिण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी प्यावे.

मखानामध्ये आढळणारे प्रथिने केसांसाठी फायदेशीर

मखान्यामध्ये लोह, मॅग्नेशियम आणि भरपूर प्रथिने असतात जे तुमचे केस पांढरे होऊन देत नाहीत. कारण त्यात अनेक पोषक घटक असतात जे केसांना नैसर्गिक रंगद्रव्यापासून रोखतात.यासोबतच मखान्याचे सेवन तुमच्या केसांमधील रक्ताभिसरण देखील सुधारते. जे नैसर्गिक पद्धतीने केसांच्या वाढीस चालना देते. मखाना शेकमध्ये नैसर्गिक साखर आणि कॅल्शियम असते जे केसांना मजबूत करते.

मखाना शेक कसा बनवायचा?

मखाना शेक बनवण्यासाठी तुम्हाला एक वाटी मखाना, एक ग्लास दूध, 4 ते 5 बदाम, 4 ते 5 काजू, केशर आणि गूळ लागेल. सर्वप्रथम दूध गरम करा आणि त्यात थोडेसे केशर घाला. आता यामध्ये तुपात भाजलेले मखाने घाला आणि काही वेळ तसेच राहू द्या. त्यात काजू आणि बदाम पावडर घाला. तुमचे मखाना दूध तयार आहे. केसांच्या वाढीव्यतिरिक्त, ते शरीराला इतर अनेक फायदे देखील देतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

न्यूड सीन शूट करण्यापूर्वी दिग्दर्शकाने ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला पाजली होती दारू; वारंवार रिटेक होत राहिले… न्यूड सीन शूट करण्यापूर्वी दिग्दर्शकाने ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला पाजली होती दारू; वारंवार रिटेक होत राहिले…
बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींना इंटिमेट सीन्ससाठी मानसिक तयारी करावी लागते. काहीजण ते अगदी सहजपणे करतात तर काहीजणांना सुरुवातीला असे सीन्स करणे थोडे...
Operation Sindoor नंतर पाकिस्तानचा सीमेवर तुफान गोळीबार, पूँछमधील 15 नागरिकांचा मृत्यू, 43 जखमी
Photo – लाडक्या बहीणींची फसवणूक; शिवसेना महिला आघाडीचा मुंबईत मोर्चा
Operation Sindoor – सीमावर्ती राज्यांमध्ये हाय अलर्ट, निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द
Ratnagiri – हल्ला… सायरन वाजताच जखमींच्या मदतीसाठी रुग्णवाहिका धावल्या, रत्नागिरीत मॉकड्रील
‘मला माझ्या शरीराची किळस येतेय’, करण जोहरने व्यक्त केली वेदना, म्हणाला ‘मी कपड्यांशिवाय आरशात नाही…’
Mockdrill नाशिकमध्ये हवाई हल्ल्याचा थरार, बचाव कार्याचे मॉक ड्रील तीस मिनिटांत पूर्ण