न्यूड सीन शूट करण्यापूर्वी दिग्दर्शकाने ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला पाजली होती दारू; वारंवार रिटेक होत राहिले…
बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींना इंटिमेट सीन्ससाठी मानसिक तयारी करावी लागते. काहीजण ते अगदी सहजपणे करतात तर काहीजणांना सुरुवातीला असे सीन्स करणे थोडे अवघड जातं. शक्यतो अभिनेत्रींना इंटिमेट सीन्स किंवा बोल्ड सीन्स करताना अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागतं. असे अनेक अनुभव अनेक अभिनेत्रींनी सांगितलं आहे.
दिग्दर्शकाने न्यूड सीन शूट करण्यापूर्वी चक्क दारू पाजली
अशीच बऱ्याचदा कलाकारांना चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन्स करावे लागतात. या दृश्यांसाठी सेलिब्रिटी वेगवेगळ्या प्रकारे स्वतःला तयार करतात. अशी एक अभिनेत्री आहे जिला दिग्दर्शकाने न्यूड सीन शूट करण्यापूर्वी चक्क दारू पाजली होती. एवढेच नाही तर त्याने अभिनेत्रीला अनेक रिटेकमध्ये शूट करायला लावले होते.
ही अभिनेत्री म्हणजे कुब्रा सैत. खरंतर, कुब्राने अनेक सीरिजमध्ये काम केले होते, पण तिला सेक्रेड गेम्समुळे प्रसिद्धी मिळाली ज्यामध्ये तिच्यासोबत नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत होता.
ऑडिशनलाच अभिनेत्रीला दिली होती न्यूड सीनची कल्पना
या सीरिजमध्ये कुब्राचा एक इंटिमेट सीन आहे. एका मुलाखतीत कुब्राने याबद्दल खुलासा केला होता. तिने म्हटलं होतं की, जेव्हा तिने या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं तेव्हा तिला सांगण्यात आलं होतं की तिला एका दृश्यात तिचे कपडे काढावे लागणार आहेत. कुब्राने म्हटलं की “मला सांगण्यात आलं होतं की हा सीन खूप सुंदरपणे चित्रित केला जाईल. जेव्हा तुमच्यासोबत चांगली टीम असते तेव्हा तुम्ही कधीही चूक करू शकत नाही.” दरम्यान अनुरागने शूटच्या आधी तिला व्हिस्की प्यायला लावली होती.
हा सीन अभिनेत्रीला 7 वेळा करायला सांगितला
एवढेच नाही तर अनुरागने तिला तो सीन 7 वेळा करायला सांगितला होता आणि प्रत्येक टेकनंतर तो कुब्राकडे येऊन तिची माफी मागत असे. कुब्रा म्हणाली,”अनुराग माझ्याकडे येऊन म्हणायचा की मी तुला हे पुन्हा पुन्हा करायला लावत आहे, फक्त एकदाच… कृपया या दृश्यामुळे माझा द्वेष करू नकोस. मला ते फक्त परिपूर्ण दिसावे असे वाटतं”
सीन शूट केल्यावर अभिनेत्री भावनिक झाली
कुब्राचा असा विश्वास आहे की तिला हा सीन करण्याच्या निर्णयाबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही. अनुरागसोबत काम करणे हा तिच्यासाठी एक अद्भुत अनुभव होता. हे दृश्ये चित्रित करताना, सेटवर फक्त काही लोक होते ज्यांची गरज होती. मात्र, हा सीन शूट केल्यानंतर ती भावनिक झाली होती असंही तिने म्हटलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List