Operation Sindoor- ने अखेर न्याय दिला.. जय हिंद म्हणत हिंदुस्थानी सैन्याने दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्यांना आॅपरेशन केले समर्पिंत

Operation Sindoor- ने अखेर न्याय दिला.. जय हिंद म्हणत हिंदुस्थानी सैन्याने  दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्यांना आॅपरेशन केले समर्पिंत

अखेर सिंदूरचा बदला सिंदूरने घेतला गेला. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. 7  मे रोजी मध्यरात्री 1.30 वाजता हिंदुस्थाने पाकिस्तानवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर, हिंदुस्थानी सैन्याने इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले, जय हिंद, न्याय झाला आहे. ही कारवाई सुरू करण्यापूर्वी, सैन्याने हल्ला करण्यास तयार, जिंकण्यासाठी प्रशिक्षित अशी पोस्ट केली होती.

 

 

संरक्षण मंत्रालयाने सोशल मीडियावर पोस्ट करून या हल्ल्याची माहिती दिली. पाकिस्तानविरुद्ध केलेल्या या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले आहे. हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर सुरू केले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला अचूक आणि संयमी प्रत्युत्तर आहे. असे संरक्षण मंत्रालयाने पोस्ट केले.

 

या कारवाईची माहिती देताना, संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, सीमापार दहशतवादी नियोजनाच्या मुळांना लक्ष्य करून, पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि कश्मीरमधील 9 दहशतवादी पायाभूत सुविधांच्या ठिकाणी लक्ष केंद्रित हल्ले करण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळावर हल्ला झाला नाही.

 

संरक्षण मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, ही एक मोजमाप केलेली कारवाई आहे ज्यामध्ये कोणत्याही पाकिस्तानी लष्करी आस्थापनेला लक्ष्य केलेले नाही. हिंदुस्थानने आपले लक्ष्य निवडण्याच्या पद्धतीत खूप संयम दाखवला आहे. यासोबतच, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर सर्व हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय करण्यात आल्याची माहिती संरक्षण अधिकाऱ्याने दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;