‘सोन्याचे दर प्रति तोळा 1 लाख रुपये होणार…’, शक्ती कपूरने 35 वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी ठरली खरी
Shakti Kapoor Gold Rate Prediction: सोन्याचे दर प्रति तोळा 1 लाख रुपयांवर पोहोचले आहे. ज्यामुळे सोनं घ्यायचं की नाही? असा प्रश्न सर्वसमान्यांमध्ये निर्माण होतो. सोन्याच्या किंमती सतत वाढत असताना अभिनेता शक्ती कपूर याचा 35 वर्षांपूर्वीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोक शक्ती कपूरला ‘बॉलिवूडचे बाबा वांगा’ म्हणत आहेत. शक्ती कपूर यांनी 35 वर्षांपूर्वी भाकीत केलं होतं की सोन्याचे दर 1 लाख रुपयांच्या पुढे जाईल.
सांगायचं झालं तर, मंगळवार, 22 एप्रिल रोजी सोन्याचे दर ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर पहिल्यांदाच सोन्याच्या किमतीने प्रति 10 ग्रॅम 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. याबाबत, 1998 मध्ये आलेल्या ‘गुरु’ सिनेमातील शक्ती कपूरची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
Shakti Kapoor had it all figured out 35 years ago !#Gold pic.twitter.com/dLnMTUe7iT
— Alok Jain
(@WeekendInvestng) April 10, 2024
व्हिडीओमध्ये शक्ती कपूर म्हणतोय, ‘आणि त्यानंतर सोन्याचे दर वाढणार. 5 हजार तोळं आहे, 10 हजार तोळं होणार. त्यानंतर 50 हजार तोळ होणारं… सोनं लाख रुपयांवर जाणार…’ शक्ती कपूरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर नेटकरी देखील कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.
व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘शक्ती कपूर शेअर बाजारातील सर्वोत्तम विश्लेषक आहे. सोने 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडेल असा अंदाज अनेक दशकांपूर्वी वर्तवण्यात आला होता.’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘जगातील सर्वोत्तम संशोधन विश्लेषक आणि बॉलिवूडचे बाबा वांगा शक्ती कपूर…’ सध्या सर्वत्र शक्ती कपूर यांची चर्चा रंगली आहे.
शक्ती कपूर यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ॲनिमल’ सिनेमात भूमिका बजावली होती. त्यानंतर शक्ती कपूर यांनी ‘मेरे हस्बँड की बीवी’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आले. त्यानंतर शक्ती कपूर यांनी कोणत्याच सिनेमाची घोषणा केलेली नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List