विश्वासघात! पाकिस्तानचे शेपूट वाकडेच… अवघ्या काही तासात शस्त्रसंधीचे उल्लंघन, श्रीनगरमध्ये स्फोट; ओमर अब्दुल्ला यांचा संताप
हिंदुस्थान आणि पाकिस्तान मध्ये शस्त्रसंधी झाल्याच्या काही तासातच पाकिस्तान पुन्हा एकदा सीमेवर गोळीबार व ड्रोन हल्ले केले आहेत. जम्मू काश्मीर चे मुख्यत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करत यावर संताप व्यक्त केला आहे
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी दुपारी युद्धविरामावर एकमत झाले होते. सीमेवरील संघर्ष घमासान युद्धाच्या दिशेने जात असताना दोन्ही देशांनी शस्त्रसंधी केली. मात्र अवघ्या काही तासांमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. जम्मू कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ही पाकिस्तानच्या आगळीकीवर संताप व्यक्त केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List