Mumbai Airport – विमानतळावर वृद्ध, दिव्यांगांची फरफट नको; हायकोर्टाने डीजीसीएला फटकारले

Mumbai Airport – विमानतळावर वृद्ध, दिव्यांगांची फरफट नको; हायकोर्टाने डीजीसीएला फटकारले

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर वृद्ध नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींच्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला (डीजीसीए) सोमवारी उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. विमानतळावर वृद्ध नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींची सोयीसुविधांअभावी फरफट होता कामा नये, याची पुरेपूर खबरदारी घ्या, अशी ताकीद न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने डीजीसीएला दिली.

सप्टेंबर 2023 मध्ये 81 वर्षीय वृद्ध महिलेला मुंबई विमानतळावर व्हीलचेअर न मिळाल्याने प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला. त्यासंदर्भात महिलेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून विमानतळावरील सुविधांच्या कमतरतेचा मुद्दा निदर्शनास आणला आहे. वृद्ध नागरिकांचा विमान प्रवास सुकर करण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचा दावा याचिकेत केला आहे. त्याची दखल घेत खंडपीठाने दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या सुनावणीवेळी डीजीसीएला वृद्धांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते. त्या आदेशाला अनुसरून डीजीसीएने प्रतिज्ञापत्र दाखल केले. मात्र त्यातील तपशील समाधानकारक नसल्याची टिप्पणी खंडपीठाने केली आणि पुन्हा एकदा डीजीसीएचे कान उपटले.

वृद्ध नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींची गैरसोय गांभीर्याने विचारात घेतली पाहिजे. विमानतळावर कोणत्याही प्रवाशांचे, विशेषत: वृद्ध नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींचे हाल होता कामा नये, यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) आणि विमान कंपन्यांनी सर्वतोपरी खबरदारी घेतलीच पाहिजे, असे न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी बजावले.

एखादी व्यक्ती विमानतळावर जाईपर्यंत ठणठणीत असू शकते. मात्र तिथे पोहोचल्यानंतर ती आजारी पडू शकते. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला गरज भासणाऱ्या वैद्यकीय मदतीची तसेच आवश्यक साधनांची उपाययोजना करावीच लागेल. विमानतळावर अनेक उड्डाणांना काही तासांचा विलंब होत असतो. सामान्य व्यक्ती तो विलंब सहन करू शकते. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींचे त्यात खूप हाल होतात, असे खंडपीठाने नमूद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘या’ 2 सिनेमांवर बंदी, नाहीतर सलमान खान – ऐश्वर्या राय यांचा मोठ्या पडद्यावर रंगला असता रोमान्स ‘या’ 2 सिनेमांवर बंदी, नाहीतर सलमान खान – ऐश्वर्या राय यांचा मोठ्या पडद्यावर रंगला असता रोमान्स
Salman Khan – Aishwarya Rai: अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या बद्दल काही वेगळं सांगायला नको. आजच्या घडीला...
गुडघ्यांवर पायऱ्या चढून मुंबईतील प्रसिद्ध शिव मंदिरात पोहोचली ‘ही’ मुस्लीम अभिनेत्री
आमचा युद्ध सराव झाला आहे, सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं स्वागत; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
निवडणूक आयोगाच्या आडून निवडणुका घेण्यास चालढकल करू नये, जयंत पाटील यांचा राज्य सरकारला टोला
Hair Care- निरोगी केसांसाठी जास्वंदीचे फूल आहे वरदान! वाचा सविस्तर
Pahalgam Attack च्या 3 दिवस आधीच पंतप्रधानांना मिळाली होती माहिती, म्हणून स्वतःचा दौरा रद्द केला; मल्लिकार्जुन खरगेंच्या दाव्यानं खळबळ
जम्मू कश्मीरमध्ये बस दरीत कोसळली, दोन प्रवाशांचा मृत्यू