पीओपी मूर्तीवर मुंबईत बंदी कायम, गुरुवारी मूर्तिकारांसोबत पालिका मुख्यालयात बैठक

पीओपी मूर्तीवर मुंबईत बंदी कायम, गुरुवारी मूर्तिकारांसोबत पालिका मुख्यालयात बैठक

पीओपीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव सुरू ठेवण्यावर मुंबई महापालिका ठाम असून मुंबईत पीओपी मूर्तीवर बंदी कायम असेल, असे मुंबई महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईबाहेरून केवळ शाडूच्या पर्यावरणपूरक मूर्तीच मुंबईला आणण्यासाठी परवानगी दिली जाईल, असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, पालिका मुख्यालयात गुरुवार, 24 एप्रिलला मूर्तिकारांच्या सर्व संघटनांबरोबर बैठक आयोजित करण्यात आली आहे.

गणेशोत्सवाला चार महिने शिल्लक असताना मुंबई महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर, केवळ पर्यावरणपूरक मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांनाच मंडपासाठी परवानगी दिली जाणार आहे. मूर्तिकारांना यंदाही शाडूची माती विनामूल्य दिली जाणार आहे. मूर्तीचे आगमन, विसर्जन सुकर होईल एवढय़ा उंचीची मूर्ती साकारण्यात यावी, अशी अटही पालिकेने घातली आहे.

मूर्तिकारांमध्ये संभ्रम 

माघी गणेशोत्सवावेळी पीओपीच्या मूर्ती असल्यामुळे मुंबई महापालिकेने गणेशमूर्तीचे विसर्जन रोखून धरले होते. महापालिकेच्या या भूमिकेमुळे मुंबईतील मानाच्या अनेक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या गणपतींचे विसर्जन केले नाही. त्यामुळे मुंबईत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यात आता गणेशोत्सवाला चार महिने राहिले असतानाही अजूनही मूर्तिकारांनी मूर्ती घडवायला सुरुवात केलेली नाही. यंदा मूर्ती पीओपीच्या की शाडूच्या घडवायच्या या संभ्रमात मूर्तिकार आणि मूर्तिकार संघटना आहे. दरम्यान, पालिकेने आम्हाला योग्य तो पर्याय द्यावा, अशी मागणी मूर्तिकार संघटनांनी केली होती. त्यामुळे गुरुवारी पालिका मुख्यालयात होणारी बैठक ही महत्त्वाची मानली जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कपूर खानदानातील अभिनेत्यासोबत इंटीमेट सीन देण्यासाठी अभिनेत्रीने…; 49 वर्षांपूर्वीचा तो सिनेमा कपूर खानदानातील अभिनेत्यासोबत इंटीमेट सीन देण्यासाठी अभिनेत्रीने…; 49 वर्षांपूर्वीचा तो सिनेमा
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री अरुणा ईरानी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. नुकत्याच 'द कपिल शर्मा शो'मध्ये आल्यानंतर त्यांनी...
सासरच्यांनी केला छळ, पतीचा हॉस्पिटलचे बिल भरण्यास नकार…; वयाच्या 45व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलीचा मृत्यू
दहशतवादाविरोधातल्या लढाईत आमचा हिंदुस्थानला पूर्ण पाठिंबा, अमेरिकन संसदेच्या अध्यक्षांची घोषणा
Mockdrill साठी सिव्हिल डिफेन्सचे दहा हजार स्वयंसेवक महाराष्ट्रात दाखल
VIDEO छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मॉकड्रीलचा सराव
Pahalgam Attack – अशी शिक्षा करा की, कोणीही हिंदुस्थानकडे डोळे वर करून पाहण्याची हिंमत करणार नाही – राहुल गांधी
मधुमेही रुग्णांसाठी ही फळे आहेत सर्वात उत्तम, वाचा सविस्तर