व्हॉट्सअॅपवर बनावट प्रोफाइल फोटो लावून 30 लाख रुपये उकळले
खासगी कंपनीच्या संचालकांचे व्हॉट्सअॅपवर बनावट प्रोफाइल फोटो लावून खात्यातून 30 लाख रुपये काढल्याची घटना समोर आली आहे. फसवणूकप्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या महिलेला कंपनी संचालकांचा नवीन नंबर असल्याचे भासवत मॅसेज करण्यात आला. त्यावर क्लिक केले असता संचालकाचा प्रोफाइल फोटो होता. त्यांना तुम्ही कार्यालयात आहात का, अशी विचारणा करण्यात आली. कार्यालयात पोहचल्यावर त्या महिलेने रिप्लाय केला त्यावेळी कंपनीच्या खात्यातून प्रोजेक्टसाठी आगाऊ 50 लाख रुपये द्यायचे असल्याने ते तत्काळ पाठवा असे सांगण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून महिलेने 30 लाख रुपये पाठवले. काही वेळाने त्यांना पुन्हा मेसेज आला. आणखी 20 लाख रुपये खात्यात पाठवावे, असे सांगण्यात आले. खात्यात तेवढी रक्कम नसल्याने महिलेने पैसे पाठवण्यास नकार दिला. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने कंपनीच्या संचालकांकडे विचारणा केली असता फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List