तब्बल 37 वर्षांनंतर मणिरत्नम आणि कमल हासन एकत्र, चित्रपटाचे पहिले गाण झाले लाँच

तब्बल 37 वर्षांनंतर मणिरत्नम आणि कमल हासन एकत्र, चित्रपटाचे पहिले गाण झाले लाँच

साऊथचा सुपरस्टार असलेल्या कमल हासन यांनी अनेक मास्टरपिस चित्रपट दिले आहेत. त्यातील अनेक चित्रपट आजही लोक आवर्जून पाहातात. कमल हासन यांचा अफलातून बोलका अभिनय आणि मणिरत्नम यांचे दिग्दर्शन आता तब्बल एका पिढीनंतर ३७ वर्षांनी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर येत आहे.या आगामी चित्रपटाचे पहिले गाणे लाँच झाले आहे.

मणिरत्नम आणि कमल हासन ही जोडी साल १९८७ च्या ‘नायकन’ या चित्रपटात एकत्र दिसली होती, हा चित्रपट धारावी- माटुंगा परिसरातील वरदराजन मुदलीयार या तत्कालीन रॉबीनहूड टाईप माफीया डॉनच्या जीवनावर आधारित होता. त्याची बॉलीवूड आवृत्ती ‘दयावान’ नंतर विनोद खन्ना यांनी साकारली होती. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत शुट झालेले या चित्रपटातील एक्शन सीन आजही अंगावर काटा आणतात. पाऊस आणि हाणामारीचे सीन चित्रपटातील क्लासिक सीन मानले जातात.

जिंगुचा गाण्याचा ट्रेलर रिलीज

अशा या ‘नायकन’ कमल हासन आणि दिग्दर्शक मणिरत्नम यांचा नवा सिनेमा ‘ठग लाईफ’ चे पहिले गाणे जिंगुचा लाँच झाले आहे. ‘ठग लाईफ’ येत्या ५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. आज १८ एप्रिल रोजी चेन्नईत या चित्रपटाच्या पहिल्या जिंगुचा गाण्याचा ट्रेलर रिलीज करण्यात आला, त्यावेळी कमल हासन यांनी आम्ही एकत्र येणे गरजेचे होते असे म्हटले होते.

इतक्या वर्षांनी देखील मणिरत्नम आणि माझ्या स्वभावात काही बदल झालेला नाही. आमची ही चूक आहे की आम्ही एकत्र येण्यासाठी इतके वर्षे वाट पाहीली. आम्ही चांगल्या पटकथेच्या शोधात होतो. त्यासाठी कदाचित इतका वेळ एकत्र येण्यास लागला असावा असे कमल हासन यांनी म्हटले आहे. आता जर आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत. तेही तुम्हा प्रेक्षकांमुळे हे शक्य झाले आहे. आम्हाला आधीच एकत्र यायला हवे होते. यासाठी मी माफी मागत आहे असेही कमल हासन म्हणाले.

कमल हासन यांनी ‘ठग लाईफ’ ची कथा मणिरत्नम यांच्या सोबत मिळून लिहीली आहे. कमल हासन म्हणाले की ‘मणिरत्नम यांच्या सोबत काम करताना त्यांना पुन्हा पुन्हा आपले गुरु आणि प्रसिद्ध दिग्दर्शक के.बालाचंदर यांची आठवण येत होती. जेव्हा मी मणिरत्नम सोबत काम करतो तेव्हा मला बालाचंदर यांची आठवणे येते. मणिला देखील हे चांगल्या प्रकारे ठावूक आहे.’

मी त्यांना हे नाव दिलेय…

आमच्यात एकमेकांबद्दल खूप  आदर आहे. मणिरत्नम यांचे निकनेम देखील असून ते ‘अंजु आरा मणिरत्नम’ आहे म्हणजे याचा अर्थ सकाळी पाच वाजताचे मणिरत्नम…दरदिवशी ते शुटींगला सकाळी सर्वात आधी सेटवर पोहचत होते. त्यामुळे मी त्यांना हे नाव दिले आहे असे हसत हसत कमल हासन यांनी सांगितले.

 के. बालाचंदर कोण ?

के.बालाचंदर हे एक प्रसिद्ध दक्षिण भारतीय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक होते.. त्यांनी कमल हासन आणि रजनीकांत यासारख्या मोठ्या स्टार्सना घडवले. कमल हासन त्यांना आपले गुरु मानतात. के. बालाचंदर सरांमुळेच आपली अभिनय कारकीर्द सुरू झाल्याचे त्यांनी अनेकदा म्हटले आहे.

हे कलाकारही दिसणार

‘ठग लाईफ’मध्ये कमल हासन यांच्यासोबत त्रिशा, सिलंबरसन, जोजू जॉर्ज, अशोक सेल्वन, नास्सर आणि अभिरामी हे कलाकारही दिसणार आहेत. चित्रपटाचे संगीत ए.आर. रहमान यांनी दिले आहे, तर कॅमेरामन म्हणून रवी के. चंद्रन आणि ए. श्रीकर प्रसाद यांनी या चित्रपटाचे संकलन केले आहे. या चित्रपटाची निर्मिती राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल, मद्रास टॉकीज आणि रेड जायंट मूव्हीज यांनी संयुक्तपणे केली आहे. मणिरत्नम यांचा, नायकन, रोजा, बॉम्बे, दिल से, इलुवर, गुरु , रावण आणि पोन्नीयन सेल्वन या चित्रपटानंतर आता हा चित्रपट येत असल्याने या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आई गं काय गोड दिसतीयेस…, प्राजक्ता माळीच्या कातील अदा, चाहत्यांचा नजरा हटेना आई गं काय गोड दिसतीयेस…, प्राजक्ता माळीच्या कातील अदा, चाहत्यांचा नजरा हटेना
अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आपल्या ग्लॅमरस अंदाजानं चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या नवनवीन अंदाजात दिसतेय.आता...
‘चीप, छपरी…’, अंकिता लोखंडे आणि निया शर्मा पुन्हा एकदा डान्सवरून ट्रोल, तर भारती सिंगचं होतंय कौतुक
लग्न ठरताच पतीचे निधन, आयुष्यभर राहिली अविवाहित; ही मराठमोळी अभिनेत्री विधवेसारखे जगली आयुष्य
शिल्पामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त…, प्रसिद्ध उद्योजकाच्या पहिल्या बायकोची खंत
दोनदा घटस्फोट झालेल्या अभिनेत्यासोबत लग्न; मराठी अभिनेत्री पतीसह श्रीलंकेत करतेय सुट्टी एन्जॉय
शौचास जाण्याआधी पाणी पिणे का महत्वाचे? जाणून घ्या फायदे
या ५ लोकांनी ‘धने घातलेले पाणी’ अजिबात पिऊ नये, अन्यथा होतील दुष्परिणाम !