वायर तुटल्याने केबल कार कोसळली, अपघातात चार पर्यटकांचा मृत्यू; एक गंभीर जखमी

वायर तुटल्याने केबल कार कोसळली, अपघातात चार पर्यटकांचा मृत्यू; एक गंभीर जखमी

केबल कार कोसळल्याने चार पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना दक्षिण इटलीत घडली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. पर्वतीय बचाव सेवा आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनेची पुष्टी केली. मृतांमध्ये दोन ब्रिटिश आणि एका इस्रायली पर्यटकाचा समावेश आहे.

शहराच्या आग्नेयेस असलेल्या कॅस्टेलमारे डी स्टॅबिया आणि मोंटे फेटो दरम्यान असलेल्या केबल कार सेवेवर हा अपघात झाला. ट्रॅक्शन केबल तुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे इटलीच्या विको इक्वेन्सच्या महापौरांचे प्रवक्ते मार्को डी रोसा यांनी सांगितले. मृत्यूमुखी पडलेल्या तीन परदेशी पर्यटकांपैकी दोघांची ओळख पटवण्यात आली आहे.

गंभीर जखमी झालेल्या पर्यटकावर नेपल्समधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. इटालियन अधिकाऱ्यांकडून या घटनेची चौकशी सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;