दही खाण्याची योग्य पद्धत कोणती? कधी अन् किती दही खाणे आरोग्यदायी

दही खाण्याची योग्य पद्धत कोणती? कधी अन् किती दही खाणे आरोग्यदायी

Benefits of Curd: उन्हाळ्यात दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. दही आरोग्यासाठी फायदेशीर असते. परंतु दही योग्य पद्धतीने खाणे महत्वाचे आहे. आयुर्वेदात दही खाण्याबाबत काही नियमही सांगितले आहेत. म्हणूनच दही कसे खावे? याबद्दल अनेक लोक गोंधळलेले असतात. दही योग्य पद्धतीने सेवन केल्यास त्याचे दुहेरी फायदे मिळू शकतात. पण जर तुम्ही दही खाताना काही चुका केल्या तर ते नुकसान देखील करू शकते.

दही खाण्याची योग्य वेळ कोणती?

दही खाण्याची योग्य वेळ कोणती? हा प्रश्न महत्वाचा आहे. दही खाण्याची योग्य वेळ सकाळचा नाश्ता मानली जाते. यामुळे नियमित नाश्त्यात दहीचा समावेश तुम्ही करू शकता. दही खाल्यामुळे पचनसंस्था सुधारते आणि पचनाशी संबंधित समस्या कमी होतात. दुपारच्या जेवणाच्या वेळी, दही, रायता किंवा ताक देखील जेवणासोबत घेता येते. हे तुम्हाला अन्न पचवण्यास देखील मदत करते. आयुर्वेदानुसार रात्री दही खाणे टाळावे. रात्री ते खाल्ल्याने पित्त आणि कफ विकारांची समस्या वाढू शकते.

दही कसे खावे?

दह्यात कोणतीही गोष्ट न मिसळता खाणे चांगले मानले जाते. जर तुम्ही साधे दही खाऊ शकत नसाल आणि तुम्हाला गोड दही खायला आवडत असेल तर थोडे मध, साखर किंवा गूळ त्यात मिसळू शकता. जर तुम्हाला खारट दही आवडत असेल तर हलके खारट दही खा. यासाठी तुम्ही दह्यात सेंधा मीठ किंवा काळे मीठ टाकू शकता. काही लोक तुपासोबत दही खातात, त्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते. दही फळ, भाज्यासोबत खाल्यास ते अधिक चांगले असते.

हे सर्व लक्षात ठेवा

  • नेहमी ताज्या दह्याचे सेवन करा. जुने दही नुकसान करणारे असते.
  • एका दिवसात एक वाटीपेक्षा जास्त दही खाऊ नका. जास्त दही खाणे आरोग्यासाठी नुकसान करणारे आहे.
  • दह्याचे स्वरुप उष्ण आहे. त्यामुळे उन्हाळ्यात दही कमी प्रमाणात सेवन करा.
  • सर्दी, खोकला असताना दही खाऊ नका.
  • दह्यात असणारे गुड बॅक्टरिया मीठ नष्ट करते. त्यामुळे दह्यात जास्त मीठ टाकू नका.
  • दही आणि दूध सोबत खाऊ नका.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;