Vitamin C Serum: संत्री खाल्ल्यानंतर त्याची साल फेकुन देताय? ‘या’ पद्धतीनं करा वापर..

Vitamin C Serum: संत्री खाल्ल्यानंतर त्याची साल फेकुन देताय? ‘या’ पद्धतीनं करा वापर..

निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये फळांचा समावेश करणे फायदेशीर ठरते. फळांचे सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्यासह तुमच्या त्वचेला देखील खूप फायदे होतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का ज्या फळांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते त्या फळांचा तुमच्या आरोग्यासह त्वचेचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. फळांमधील संत्री तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. तुम्हाला जर त्वचे संबंधित समस्या असल्या तर तुमच्यासाठी संत्र्याच्या साली खूप फायदेशीर ठरतील. संत्रीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते ज्याचा वापर केल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात त्यासोबतच तुम्हाला पिंपल्स किंवा पिग्मेंटेशनच्या समस्या असतील तर त्या दूर होतात.

तुमच्या त्वचेला निस्तेज आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्ही संत्र्याच्या सालीचा वापर करू शकता. तुमच्या त्वचेसाठी तुम्ही संत्र्याच्या सालीपासून स्क्रब बनवू शकता आणि त्याचा वापर तुमच्या चेहऱ्यावर आणि संपूर्ण शरीरावर करू शकता. या स्क्रबचा वापर केल्यानंतर तुमच्या चेहऱ्याला स्वच्छ थंड पाण्याने धुवा. त्यानंतर तुम्ही घरच्या घरी संत्र्याच्या सालीपासून टोनर बनवू शकते. संत्र्याचा टोनर बनवण्यासाठी तुम्ही काही सोप्या ट्रिक्स फॉलो करू शकता. या टोनरच्या वापरामुळे तुमच्या त्वचेसंबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.

संत्र्याच्या सालीचा टोनर कसा बनवायचा?

सर्वप्रथम एका पॅनमध्ये थोडे पाणी घालून त्यात संत्र्याची साल मिक्स करा.

त्यानंतर त्या पाण्यामध्ये संत्र्याची साल चांगली उकळून घ्या.

ज्या वेळी पाण्याचा रंग नारंगी होतो आणि पाणी अर्ध होतो त्यानंतर गॅस बंद करा.

संत्र्याची साल गाळणीच्या मदतीनं गाळून त्यामध्ये 2-3 व्हिटॅमिन ई कॅपस्यूल आणि गुलाब पाणी मिक्स करा.

सर्व मिश्रण एकत्र एका स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि तुमच्या चेहऱ्यावर वापरा.

 

व्हिटॅमिन सी टोनर त्वचेच्या छिद्रांना निरोगी ठेवण्यास मदत करते. संत्र्याच्या सालीचा टोनर त्वचेला हायड्रेट करण्यास आणि त्यानंतर त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करते. यामुळे त्वचा निरोगी राहते आणि त्वचा उघडल्यानंतर छिद्र पूर्णपणे घट्ट होतात. जर तुम्हाला तुमच्या त्वचेवर सुरकुत्या येऊ नयेत आणि बारीक रेषा टाळायच्या असतील तर तुम्ही हे व्हिटॅमिन सी टोनर वापरू शकता. हे टोनर तुमच्या त्वचेचा पोत सुधारण्यास आणि नंतर कोलेजन वाढवण्यास मदत करते. यामुळे त्वचा घट्ट होण्यास मदत होते आणि त्वचेची चमक देखील वाढते. व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक अॅसिडने समृद्ध असलेल्या या टोनरमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे मुरुमे आणि डाग टाळतात. याशिवाय, हे टोनर त्वचेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. म्हणून या टिप्स फॉलो करा आणि नंतर त्या तुमच्या त्वचेसाठी वापरा.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;