Post Pregnancy Care: C- Section नंतर निरोगी आरोग्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो, जाणून घ्या तज्ञांचे मत….

Post Pregnancy Care: C- Section नंतर निरोगी आरोग्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो, जाणून घ्या तज्ञांचे मत….

प्रेग्नेंसी प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण असतो. या काळामध्ये महिलांनी त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु अनेकवेळा काही कॉंप्लिकेशनमुळे सी सेक्शन शस्त्रक्रिया केली जाते. सी सेक्शन शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिलेनी तिच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. या काळामध्ये योग्य काळजी नाही घेतल्यामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. प्रेग्नेंसीनंतर महिलेच्या शरीरामध्ये अनेक हार्मोनल बदल होतात. शरीरातील हार्मोन्स असंतुलित झाल्यामुळे चिडचिड होणे, डिप्रेशन येणे, गोष्टी विसरणे आणि थकवा येणे यांच्या सारख्या समस्या उद्भवतात.

सी सेक्शन नंतर महिलांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. योग्य पोषक पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करणे गरजेचे असते. सी सेक्शन नंतर खाण्यापिण्यापासून ते योग्य वेळी चालण्यापर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. तुमची छोटीशी चुक तुमचं आरोग्य बिघडून त्याच्यावर गंभीर परिणाम करू शकते. सी सेक्शन झाल्यानंतर जास्त व्यायाम करू नये यामुळे तुमच्या पोटावर भार येऊ शकतो. चला तर जाणून घेऊया सी सेक्शन नंतर आरोग्याची काळजी कशी घ्यावी? तज्ञांचे यावर काय मत आहे.

सी सेक्शनच्या सुमारे 6 महिन्यांनंतरच वजन कमी करण्याचे नियोजन करावे. यासाठी दैनंदिन व्यायामासोबतच आहाराचीही काळजी घ्यावी लागते. बाळंतपणानंतर 88 आठवडे वजन कमी करू नका किंवा क्रॅश डाएटिंग करू नका. असे केल्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. सी सेक्शन नंतर आहारात प्रथिने आणि जीवनसत्त्वे समाविष्ट करणे महत्वाचे आहे. कारण प्रेग्नेंसीनंतर महिलांचे शरीर कमकुवत होते. बाळाला स्तनपान देण्यासाठी चांगला आहार खाणे आवश्यक आहे. असे नाही केले तर तुमच्या शरीरामध्ये अशक्तपणा आणि थकवा यासारख्या समस्या उद्भवू शकतात. सी सेक्शननंतर महिलांना त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. आहारात दूध, दही, मांस, मासे, अंडी आणि सुकामेवा यांचा समावेश करावा. याशिवाय फळे आणि हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात खा. बाळंतपणानंतर शरीरात व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियमची खूप गरज असते. यासाठी, डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही काही आठवड्यांनी दूध घेऊ शकता, परंतु बद्धकोष्ठता निर्माण करणारे पदार्थ खाणे टाळा.

सी सेक्शन डिलिव्हरीनंतर, महिलांनी फास्ट फूड आणि पिझ्झा, बर्गर, चाउमीन सारख्या जंक फूडपासून दूर राहावे. रिफाइंड पिठापासून बनवलेल्या इतर गोष्टी खाणे देखील टाळावे. बाळंतपणानंतर कमीत कमी 6 महिने व्यायाम करणे टाळा. फक्त हलके चालणे किंवा धावणे करा, चुकूनही जास्त व्यायाम करू नका. ध्यान नक्की करा. जर काही समस्या येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यासोबतच जास्त प्रमाणात जंक फूडचे सेवन टाळा.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;