रात्री लवकर जेवणाचे 5 पेक्षा जास्त फायदे? वजन कमी होणार अन्…
नास्ता सकाळी उठल्यानंतर दोन तासांत केले पाहिजे. दुपारचे जेवण 1 ते 2 वाजे दरम्यान केले पाहिजे. संध्याकाळचे जेवण 7 वाजेपूर्वी केले पाहिजे. कधी उशीर झाला तर 8 पर्यंत संध्याकाळचे जेवण करत येईल.
वजन कमी होणार- तुम्ही लवकर जेवण केल्यावर शरीर त्या जेवणाचा चांगला वापर करतो. त्यामुळे शरीरात मेटाबोलिज्म निर्मितीचा वेग वाढतो. जेवण सहज पचते आणि शरीराला नवीन उर्जा मिळते. लवकर जेवल्यामुले कॅलरी बर्न होते, त्यामुळे वजन कमी होते.
पचन चांगले होणार- जेव्हा तुम्ही झोपणे आणि जेवणा दरम्यान विशिष्ट गॅप ठेवतात, तेव्हा जेवण सहज पचते. परंतु रात्री उशिरा जेवल्यामुळे जेवण पचत नाही. त्यामुळे पोट दुखी, गॅस, पोटावर सूज येणे यासारख्या समस्या निर्माण होतात.
मधूमेहसाठी फायदेशीर - मधूमेह म्हणजे डायबिटीज असलेल्या रुग्णांसाठी वेळेवर जेवण करणे आवश्यक असते. मधूमेहाच्या रुग्णांनी लवकर जेवण केल्यावर शरीरात ग्लूकोज बनवण्यासाठी वेळ मिळतो. त्यामुळे डायबिटीज कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होईल. उशिरा जेवण करणे डायबिटीजच्या रुग्णांसाठी चांगले नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.





Comment List