मखाने दूधासोबत खाल्ल्याने काय मिळतात लाभ ? तज्ज्ञांकडून जाणा

मखाने दूधासोबत खाल्ल्याने काय मिळतात लाभ ? तज्ज्ञांकडून जाणा

दूधात मखाने मिसळून खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला खूप मोठा फायदा होता. मखाने खाल्ल्याने अनेक शारीरिक आजार दूर होतात. ज्यांना पचनाची समस्या आहे त्यांच्यासाठी तर मखाने वरदान आहेत. मखाना आणि दूध याचे एकत्र अन्न खाल्ल्याचे आणखीन देखील बरेच फायदे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थ संकल्पात मखाने निर्मितीसाठी बिहार राज्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

दूध आणि मखाना शरीरासाठी खूपच लाभदायक असतो. अनेक जण वजन कमी करण्यासाठी केवल मखाने खातात. परंतू दूधासोबत जर मखाने खाल्ले तर आरोग्यासाठी मोठा लाभ होतो. मखाने आणि दूध एकत्र खाल्ल्याने अनेक व्याधी दूर होतात. मखाने पोषक म्हणून ओळखले जातात. यांना सुपर फूड मानले जाते. तर दूधाला तर पूर्ण अन्न म्हटले जाते. त्यामुळे दोन्ही एकत्र खाल्ल्याचा खूपच लाभ होत असतो.

दूधात प्रोटीन, कॅल्शियम, विटामिन्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणावर आढळतात. जेव्हा तुम्ही मखान्यांना दूधात मिक्स करुन खाता तेव्हा याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. अनेक पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळतात. आयुर्वेदिक एक्सपोर्ट डॉ. किरण गुप्ता यांच्यामते मखाने दूधात सोबत खाल्ल्याने शरीरास आवश्यक पोषणमूल्ये मिळतात.

बिहारमध्ये मखाना बोर्डाची स्थापना करण्याचा निर्णय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी घेतला आहे. त्यामुळे या उद्योगात गुंतलेल्या बिहारमधील मिथिलांचल प्रदेशातील, विशेषत: दरभंगा, मधुबनी, सीतामढी, सहरसा, कटिहार, पूर्णिया, किशनगंज, अररिया, सुपौल आणि मधेपुरा जिल्ह्यातील पाच लाखांहून अधिक शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. मखाने हे कमळाच्या बियांपासून तयार केले जातात. मखान्याला इंग्रजीत फॉक्स नट्स म्हणतात. मखाना हा एक वनस्पतीद्वारे तयार केला जणारा अन्न पदार्थ आहे. मखान्याचे उत्पादन भारतात, कोरिया, जपान, रशियामध्ये केले जाते.

हाडांना मजबूत करते

मखाने आणि दूध एकत्र घेतल्याने शरीराला फायदा होतो. कारण दूध आणि मखाने दोन्हीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण मोठे असते. प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, फायबर, पोटॅशियम, लोह आणि जस्त यांचेही मखान्यात मोठे प्रमाण असते.  आर्थराईटिस आणि ऑस्टीयोपोरोसिस सारख्या हाडांच्या संबंधित आजारांना बरे करण्यासाठी महत्वाचे ठरते. याचा नियमित आहारात वापर केल्याने हाडे आणि दांत दोन्ही अगदी मजबूत आणि आरोग्यदायी होतात. म्हणून मखाने खूप फायदेशीर असतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;