ग्रीन टी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का? तज्ज्ञांचं काय आहे मत?

ग्रीन टी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का? तज्ज्ञांचं काय आहे मत?

आजकाल सर्वजण ग्रीन टी प्यायला प्राधान्य देत आहेत. कारण वजन वाढल्याने अनेक आजार होत असल्याने आता अनेकजण वजन कमी करण्याच्या मागे लागले आहेत. त्यामुळे ग्रीन टी प्यायल्याने वजन कमी होते का ? याची सर्वांना उत्सुकता असते. यावर तज्ज्ञांनी काय म्हटले आहे? ग्रीन टी पिणे खरेच आरोग्यासाठी चांगले आहे का? केवळ वजन कमी करण्यासाठीच नव्हे तर अनेक आजारांवर ग्रीन टी पिणे फायद्याचे असते असे म्हटले जात आहे. तर पाहूयात ग्रीन टी प्यायल्याने खरोखरच वजन कमी होते का?

फॅटी लिव्हरवर उपचार आणि  स्कीनवर ग्लो येण्यासाठी आणि महत्वाचे म्हणजे  वजन कमी करण्यासाठी अनेक जण ग्रीन टीला प्राधान्य देत आहेत. आरोग्यासाठी देखील ग्रीन टीचे अनेक लाभ होत असतात. परंतू ग्रीन टी पिण्याचे देखील काही नियम आहेत. काय आहेत नियम पाहूयात…

ग्रीन टीत कोणते न्यूट्रिएंट्स आढळतात

आजकाल सर्वजण आरोग्याविषयी जागरुक होत आहेत. ग्रीन टी पिण्याचे चलन अलिकडे वाढत आहे. या संदर्भात काही तज्ज्ञांनी सांगितले आहे की ग्रीन टी खरोखरच वजन कमी करत असते. परंतू काही लोकांनी ग्रीन टी पिल्याने त्यांना फायद्याऐवजी नुकसान होण्याचा धाका असतो. ग्रीन टीमध्ये अनेक पोषक तत्वं असतात. जी आरोग्याला फायदेमंद असतात. या मॅगनिझ, पोटॅशियम, कॉपर,आयर्न, सोडियम,झिंक, कॅल्शियम, फॉस्फोरस आणि मॅग्नेशियम ग्रीन टीमध्ये असतात. तसेच ग्रीन टीमध्ये कॅटेचीन आणि पॉलीफेनॉल्स सह अनेक एंटीऑक्सिडेंट्स आढळतात.आपले आऱोग्य चांगले ठेवण्यासाठी ते आवश्यक असतात.

ग्रीन टी आरोग्यासाठी किती लाभदायक

कधीतरी एक किंवा दोन कप ग्रीन टी प्यायल्याने आपल्याला ग्रीन टीचा खास लाभ मिळत नाही. दररोज जर ग्रीन टी प्यायला सुरुवात केली तर निश्चितच आश्चर्यकारक फायदे मिळतात. ग्रीन टीत आरोग्याच्या अनेक समस्यांना कमी करु शकते असे तज्ज्ञांचे मत आहे.

ग्रीन टी प्यायल्याने वजन कमी होते ?

वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी उपयोगी असते. यातील कॅटेचीन नामक एंटीऑक्सिडेंट घटक शरीरातील फॅट बर्न करण्याची प्रक्रीया वेगवान करते, याशिवाय ग्रीन टीत कार्ब्स, फॅट आणि शुगरचे प्रमाण अजिबात नसल्यासारखे असते. यामुळे ग्रीन टीने वजनवाढण्याचा कोणताही धोका नसतो. केवळ ग्रीन टी प्यायल्याने मात्र वजन कमी होते असे अजिबात नाही यासाठी तुम्हाला तुमचा संतुलित आहार आणि नियमित व्यायाम देखील महत्वाचा आहे.

ग्रीन टीत कोणते पदार्थ टाकावेत…

अनेकांना ग्रीन टीची तुरट कडू चव आवडत नाही. त्यामुळे याला चव येण्यासाठी तुम्ही यात मध, आले, लिंबू, तुलस,लवंग,इलायची, दालचिनी, हळद किंवा पुदीना घालू शकता.यातील एकावेळी एक किंवा वस्तू टाकाव्यात अन्यथा ग्रीन टी काढा बनेल..

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;