दिवसातून किती वेळा नाश्ता आणि जेवण करणे गरजेचे? जाणून घ्या तज्ञांचे मत

दिवसातून किती वेळा नाश्ता आणि जेवण करणे गरजेचे? जाणून घ्या तज्ञांचे मत

भारत हा असा देश आहे जिथे परदेशी पर्यटकांना ही इथले जेवण आवडते. परंतु भारतीय संस्कृतीत सामान्यतः ब्रंच अधिक लोकप्रिय आहे. येथे लोक सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान नाश्ता करून कामावर जातात. इतकच नाही तर अनेक वेळा लोक नाश्ता सोडून देतात ही एक वाईट सवय आहे. याशिवाय भारतीयांना दिवसभरात अनेक कप चहा किंवा कॉफी पिण्याची सवय आहे आणि हे देखील आरोग्यासाठी हानिकारक आहे.यामुळे भारतीयांनी एका दिवसात किती वेळा जेवण करावे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. याबाबत आहार तज्ञ मेधवी गौतम यांनी सांगितले की भारतीयांना दिवसभर फक्त जेवण करण्याची सवय असते आणि त्यानंतर फ्कत ते चहा किंवा कॉफी घेतात. परंतु हे करणे योग्य नाही.

नाश्ता पूर्ण असावा
आहार तज्ञ मेधवी गौतम सांगतात की सामान्यतः भारतीयांनी दिवसभरात तीन वेळा जेवण आणि दोन वेळा नाश्ता केला पाहिजे. मेधवी पुढे सांगतात की सकाळचा नाश्ता जड आणि पोटभर असावा कारण यानेच आपला दिवस सुरू होतो. सकाळची सुरुवात उत्साही करण्यासाठी नाश्ता पौष्टिक असणे महत्त्वाचे आहे. याशिवाय दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण चूकवण्याची गरज अजिबात नाही. तसेच तुम्ही चहा सोबत काही आरोग्यदायी पदार्थ खाऊ शकता.

मेधवी आणि जेवणाची योग्य वेळ कोणती?
मेधवी यांच्यामध्ये तुम्ही सकाळी आठ ते नऊ या वेळेत नाश्ता केला पाहिजे. तर दुपारचे जेवण एक ते दोन या वेळेत करणे अपेक्षित आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सकाळच्या नाश्त्यासोबत चहा किंवा कॉफी घेऊ शकता पण हे लक्षात ठेवा की तुम्ही नाश्त्यांमध्ये फक्त आरोग्यदायी पदार्थ खाल्ले पाहिजे. याशिवाय संध्याकाळी छोटी भूक भागवण्यासाठी तुम्ही चहा किंवा कॉफी सोबत मुरमुऱ्याचा चिवडा किंवा भेळ तसेच काही आरोग्यदायी स्नॅक्स खाऊ शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही संध्याकाळी स्मुदीचे सेवन करू शकता. यानंतर रात्रीच्या जेवणात हलके अन्न घ्या.

आहार तज्ञ मेधवी गौतम यांनी सांगितले की तुम्ही नेहमी रात्रीचे जेवण हलके करा. खरे तर बरेच लोक रात्रीचे जेवण केल्यानंतर कोणतीही शारीरिक क्रिया करत नाहीत त्यामुळे अन्न पचनास वेळ लागतो म्हणून तुम्हाला अपचन किंवा ऍसिडिटी ची समस्या निर्माण होऊ शकते. ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही रात्रीचे जेवण रात्री आठ वाजेपर्यंत करा आणि तेही हलके करा. जेणेकरून तुमच्या पोटालाही आराम मिळेल.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;