थकल्यानंतर रात्री नीट झोप लागत नाहीये? ‘या’ टिप्स देतील आरामदायक झोप

थकल्यानंतर रात्री नीट झोप लागत नाहीये? ‘या’ टिप्स देतील आरामदायक झोप

तुम्ही एखाद्या दिवशी खूप थकले असाल तर तुम्हाला लगेच चांगली झोप लागते. अशातच तुम्हाला चांगली झोप लागली तर त्याचा तुमच्या शरीरालाच नव्हे तर मनालाही आराम मिळतो. आजकालचे व्यस्त जीवन, कामाच्या जबाबदाऱ्यांमुळे लोकांना नीट झोप येत नाही. अनेकदा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकल्याने सुद्धा झोप येत नाही. पण हा थकवा दूर करण्यासाठी आणि ताजेतवाने वाटण्यासाठी चांगली झोप घेणं खूप गरजेचं आहे. मात्र, काही लोकं थकल्यानंतर अनेकदा झोपत नाहीत. यामागे शरीरात पोषक तत्वांची कमतरता देखील असू शकते. सध्या तुम्ही चांगल्या झोपेसाठी काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. प्रौढ व्यक्तीने दररोज किमान सात ते आठ तासांची चांगली झोप घ्यावी. यासोबतच योग्य वेळी झोप घेणंही गरजेचं आहे. रात्री उशीरापर्यंत जागे राहण्याची सवय ही निद्रानाशाची समस्या असू शकते. तर निद्रानाशाची समस्या दूर करण्यासाठी या टिप्स फॉलो करा.

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज काही वेळ चालणे, हलके वर्कआउट करणे यासारख्या शारीरिक हालचाली करणे खूप गरजेचे आहे. याशिवाय भरपूर झोप घ्या. नीट झोप न घेतल्याने वजन वाढण्याबरोबरच आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. चांगल्या झोपेसाठी काय करावे ते आपण जाणून घेऊया.

झोपण्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स दूर ठेवा

बऱ्याचदा आपण पाहतो की अनेकांना झोपण्याच्या आधी टीव्ही पाहण्याची सवय असते. खाकरून आजच्या काळात लहानांपासून मोठ्यांपर्यंत रात्री उशिरापर्यंत मोबाईल फोन पाहत असतात. त्यामुळे अनेकदा झोपण्यापूर्वी मोबाईल डोक्याजवळ ठेऊन झोपतात. अशाने तुमची सारखी झोप मोड होत असते. तर अनेकदा फोन बंद केल्यानंतर सुद्धा बराच वेळ झोप लागत नाही. यासाठी झोपण्यापूर्वी एक तास आधी लॅपटॉप, फोन बंद करून ठेवा. तसेच कोणत्याही स्क्रीन केलेल्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सपासून दूर राहा.

झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने आंघोळ करावी.

जेव्हा तुम्हाला खूप थकल्यासारखे वाटते तेव्हा रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने आंघोळ करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. हा मार्ग अवलंबल्याने तुम्हाला खूप फ्रेश आणि रिलॅक्स वाटते, तसेच स्नायूंचा थकवा कमी होऊन तुम्हाला चांगली झोप लागते.

तेलाने मसाज करा

झोप येत नसेल तर किमान 20 मिनिटे पाय कोमट पाण्यात ठेवा आणि नंतर टॉवेलने पाय नीट पुसल्यानंतर तळव्याला थोड्या तेलाने मसाज करा. यासोबतच तुमच्या पायांच्या पोटऱ्याना देखील तेलाने मालिश केल्यानेही चांगली झोप येते.

झोपेच्या वेळी योगा करणे योग्य आहे का?

जर तुम्हाला झोप येत नसेल तर तुम्ही झोपेच्या वेळी योगा करू शकता. यात तुम्ही बुद्ध कोनासन, सुखासन, शवासन, इत्यादी योगासन करू शकता. याशिवाय चिंता, तणाव यासारख्या गोष्टींपासून दूर राहण्यासाठी दररोज काही वेळ मेडिटेशन करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;