आता पार्लरला जाण्याची पडणार नाही गरज, घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंनीच करा हेअर स्पा

आता पार्लरला जाण्याची पडणार नाही गरज, घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंनीच करा हेअर स्पा

आजच्या काळात प्रत्येकाला सुंदर आणि निरोगी केस हवे असतात. परंतु बदलती जीवनशैली, प्रदूषण आणि रासायनिक उत्पादनामुळे केसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. केस कोरडे निर्जीव आणि कमकुवत होतात. त्यामुळे केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी हेअर स्पा हा उत्तम पर्याय आहे. परंतु पार्लरमध्ये हेअर स्पा करणे महाग असू शकते आणि प्रत्येकाला पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा करणे जमत नाही. जाणून घेऊ घरगुती उपायांनी घरीच हेअर स्पा कसा करायचा. या पद्धती केवळ स्वस्तच नाहीत तर आपले केस नैसर्गिक पद्धतीने चमकदार आणि मजबूत बनवण्यास मदत करतात. जाणून घेऊ पार्लरमध्ये न जाता घरगुती वस्तू वापरून हेअर स्पा कसा करता येईल आणि त्याचे फायदे काय आहेत.

हेअर स्पासाठी घरगुती उपाय

केसांना तेलाने मालिश करा
कोमट खोबरेल तेल, बादाम तेल किंवा ऑलिव्ह ऑइल यापैकी कुठल्याही तेलाने केसांना व्यवस्थित मसाज करा. त्यामुळे रक्ताभिसरण वाढते आणि केसांना मुळापासून पोषण मिळते.

वाफ घेणे
गरम पाण्यात टॉवेल भिजवा. तो पिळून घ्या आणि डोक्याभोवती गुंडाळा. वाफेमुळे केसांची छिद्र उघडता. ज्यामुळे तेल आणि पोषक घटक केसांमध्ये खोलवर जातात.

हेअर मास्क
हेअर मास्क तयार करण्यासाठी तुम्ही केळी आणि मधाचा वापर करू शकता. एक पिकलेले केळ घ्या आणि त्यात दोन चमचे मध टाकून पेस्ट बनवा आणि ही पेस्ट केसांना लावून तीस मिनिटे केस तसेच ठेवा. यानंतर केस स्वच्छ धुऊन घ्या. यामुळे केस मऊ आणि चमकदार होतील.

शाम्पू आणि कंडिशनिंग
तीस मिनिटांसाठी हेअर मास्क केसांवर तसाच ठेवल्यानंतर सौम्य शाम्पू ने केस धुवा आणि केसांच्या प्रकारानुसार कंडिशनर लावा. हे केस स्वच्छ आणि मॉइश्चराइज करते.

सिरम वापरा
केस धुतल्यानंतर किंचित ओल्या केसांवर तुमचे आवडते हलके सिरम लावा. हे केसांना गुंता होण्यापासून वाचवते आणि केसांना चमकवते. सिरम लावल्यानंतर केस विंचरल्यावर केस अगदी सहज मोकळे होतात.

हेअर स्पा केल्याचे फायदे

केसांचे आरोग्य सुधारते
हेअर स्पा केसांना चांगले आरोग्य देते. असे केल्याने केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळण्याची समस्या ही कमी होते. हेअर स्पामुळे केसांचा दर्जाही सुधारतो.

कोंडा आणि कोरडेपणा दूर करते
अनेकांना कोंड्याची खूप समस्या असते यासाठी हेअर स्पा खूप फायदेशीर आहे. घरी केलेला हेअर स्पा कोरडेपणा आणि कोंड्याची समस्या कमी करण्यास मदत करते.

तणाव कमी होतो
हेअर स्पा करताना मसाज केला जातो आणि वाफ दिली जाते. ज्यामुळे डोक्यांच्या स्नायूंना आराम मिळतो त्यामुळे रोजचा ताणही कमी होतो.

केसांना नैसर्गिक चमक मिळते
चुकीच्या जीवनशैलीमुळे केसांची चमक कमी होऊ लागते पण नियमित हेअर स्पा केल्याने केसांमध्ये नैसर्गिक चमक परत येते. त्यामुळे केस चमकदार होतात आणि अतिशय सुंदर दिसतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;