खजुरा पेक्षाही जास्त फायदेशीर आहेत त्याच्या बिया, आरोग्यसह त्वचा आणि केसांनाही होतो त्याचा फायदा

खजुरा पेक्षाही जास्त फायदेशीर आहेत त्याच्या बिया, आरोग्यसह त्वचा आणि केसांनाही होतो त्याचा फायदा

खजूर हे नाव ऐकताच आपल्या मनात आरोग्य आणि चवीचे विचार येतात. निसर्गाची कँडी म्हणूनही खजुराची ओळख आहे. पोषक तत्वांनी समृद्ध आणि ऊर्जेच्या उत्कृष्ट स्त्रोत म्हणजे खजूर मानले जाते. हिवाळ्यात शरीराला गरम करण्यासाठी असो किंवा गोडधोडाने भरलेला कोणताही पदार्थ तयार करणे असो खजूर सर्वत्र वापरले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का की खजूर जितके फायदेशीर आहेत तितकेच त्याच्या बिया देखील उपयोगी असू शकतात. अनेक जण खजुर खाल्ल्यानंतर त्याच्या बिया टाकून देतात. खजुराच्या बियांमध्ये भरपूर पोषक आणि औषधी गुणधर्म असतात ज्याचा वापर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात अनेक प्रकारे करू शकता. जाणून घेऊ खजुराच्या बिया कशा वापरल्या जाऊ शकतात आणि ते आपल्या निरोगी तसेच दैनंदिन जीवनासाठी किती फायदेशीर ठरू शकतात.

हेल्दी ड्रिंक म्हणून पावडर बनवणे
खजुराच्या बिया वाळवून आणि बारीक करून पावडर बनवता येते. या पावडरचा वापर तुम्ही कॉफी सारखे पेय तयार करण्यासाठी करू शकता. कॅफिन मुक्त असण्याव्यतिरिक्त ते अँटिऑक्सिडंटने देखील समृद्ध आहे.

त्वचा आणि केसांची काळजी
खजुराच्या बियांची पावडर स्क्रब म्हणून वापरली जाऊ शकते. ही पावडर मृत त्वचा काढून टाकते आणि त्वचा चमकदार बनवते. त्याचे तेल केस मजबूत करण्यासाठी आणि केस गळणे टाळण्यासाठी वापरले जाऊ शकतात.

पचनासाठी फायदेशीर
खजुराच्या बियांमध्ये भरपूर फायबर असते जे पचन संस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. याचे पावडर स्वरूपात सेवन केल्याने बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

नैसर्गिक खत
खजुराच्या बिया वाळवून त्या मिक्सर मधून काढून त्याचा नैसर्गिक खत म्हणून वापर केला जाऊ शकतो. यामुळे मातीची गुणवत्ता सुधारते आणि वनस्पतींना आवश्यक पोषक तत्वे प्रदान करते.

खजुराच्या बियांचे फायदे
अँटिऑक्सिडंटने समृद्ध: खजुराच्या बियांमध्ये शक्तिशाली अँटिऑक्सिडंट असतात जे शरीराला मुक्त रॅडिकल्स मुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात.

रक्तातील साखरेचे नियंत्रण: हे रक्तातील साखर संतुलित करण्यास मदत करते आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर ठरू शकते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते: याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर: खजुराच्या बियांची पावडर कोलेस्टॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

खजुराच्या बियांची पावडर कशी तयार करायची?

खजुराच्या बिया चांगल्या प्रकारे धुवून त्या उन्हात वाळवा. कोरड्या झाल्यानंतर त्यांना हलके भाजून घ्या जेणेकरून त्यांचा ओलावा पूर्णपणे निघून जाईल. थंड झाल्यावर या बिया मिक्सरमधून बारीक करून त्याची पावडर बनवा. ही पावडर एका हवाबंद डब्यात ठेवा.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;