केसांची निगा राखण्यासाठी घरीच तयार करा हर्बल शाम्पू, जाणून घ्या शाम्पू तयार करण्याची पद्धत आणि फायदे

केसांची निगा राखण्यासाठी घरीच तयार करा हर्बल शाम्पू, जाणून घ्या शाम्पू तयार करण्याची पद्धत आणि फायदे

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि रसायनांनी भरलेल्या शाम्पूच्या वापरामुळे अनेकांचे केस खराब होतात. बाजारात मिळणारे शाम्पू आणि केसांची निगा राखणारे उत्पादनांनमध्ये अनेकदा अनेक प्रकारची रसायने असतात. ते जास्त काळ वापरल्यास केस खराब होतात. त्यामुळे हर्बल शाम्पू हा उत्तम पर्याय ठरू शकतो. हर्बल शाम्पू केवळ केस स्वच्छ आणि पोषण करण्यास मदत करत नाही तर ते केसांची गुणवत्ता सुधारतात आणि केसांची नैसर्गिक चमक वाढवतात.

तुम्हालाही रासायनिक उत्पादने टाळायची असतील आणि हर्बल शाम्पू घरी तयार करायचा असेल तर जाणून घ्या हर्बल शाम्पू तयार करण्याची पद्धत. हर्बल शाम्पू बनवण्यासाठी अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतींचा वापर केला जाऊ शकतो. त्यात केस निरोगी ठेवण्याचे गुणधर्म आहेत. केस गळणे थांबवते आणि टाळूचे संक्रमण होण्यापासून संरक्षण करते. जाणून घेऊ त्या औषधी वनस्पती बद्दल ज्या तुम्ही तुमच्या हर्बल शाम्पू मध्ये वापरू शकता. हर्बल शाम्पू कसा तयार करायचा ते देखील जाणून घेऊ.

हर्बल शाम्पू बनवण्यासाठी आवश्यक औषधी वनस्पती
रिठा दहा ते बारा, शिकेकाई पाच ते सहा तुकडे, आवळा पाच ते सहा नग, मेथीचे दाणे दोन चमचे, कडुलिंबाची पाने दहा ते पंधरा, कोरफडीचा गर दोन ते तीन चमचे, पाणी एक लिटर

शाम्पू बनवण्याची पद्धत
हर्बल शाम्पू बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रिठा, शिकेकाई, आवळा आणि मेथीचे दाणे एक लिटर पाण्यात रात्रभर भिजवावे लागतील. त्यामुळे त्याचे सर्व नैसर्गिक गुणधर्म पाण्यात मिसळतील. यानंतर सकाळी हे मंद आचेवर 15 ते 20 मिनिटे उकळवा. उकळण्याने या औषधी वनस्पतीचे पौष्टिक घटक पाण्यात पूर्णपणे विरघळतात. ते थंड होऊ द्या आणि नंतर कापड किंवा गाळणीतून गाळून घ्या. तुम्हाला हवे त्याप्रमाणे तुम्ही ते घट्ट किंवा पातळ ठेवू शकता. जर तुम्हाला केसांना अधिक पोषण द्यायचे असेल तर तुम्ही गाळलेल्या मिश्रणात दोन ते तीन चमचे कोरफडीचा गर टाकू शकता.

अशा पद्धतीने करा वापर
हा हर्बल शाम्पू ओल्या केसांवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. पाच ते दहा मिनिटे केसांवर तसाच राहू द्या. नंतर स्वच्छ पाण्याने केस धुवा. हा हर्बल शाम्पू एक आठवडा रेफ्रिजरेटर मध्ये ठेवता येतो. याचा नियमित वापर केल्याने केसांच्या आरोग्यावर परिणाम लवकर दिसून येतो.

औषधी वनस्पतींचे फायदे
रिठा: केस नैसर्गिक रित्या स्वच्छ करते., शिकाकाई: केस मजबूत आणि चमकदार बनवते., आवळा: केस गळणे कमी होते आणि केस वाढण्यास मदत मिळते., कडूलिंब: कोंडा दूर करण्यास मदत करते., मेथी: केसांना आद्रता देते आणि कोरडेपणा कमी करते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;