चिमुटभर हिंगाचे ढिगभर फायदे, अपचनापासून ते… जाणून घ्या

चिमुटभर हिंगाचे ढिगभर फायदे, अपचनापासून ते… जाणून घ्या

हिवाळ्यात तुमच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असल्यामुळे तुम्हाला संसर्गाचे आजार होऊ शकतात. तुमच्या आहारामध्ये वशेष पोषक तत्वांचा समावेश करणं गरजेचे असते. आयुर्वेदामध्ये, हिगला सुपरफूड मानले जाते. हिंग तुमच्या आरोग्याला निरोगी ठेवण्यास मदत करते. हिंगाचे आहारामध्ये नियमित सेवन असल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारचे रोग होत नाहीत. हिंगामध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-मायक्रोबियल असे औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा संसर्ग होत नाहीत.

अनेकवेळा सकाळी उठल्यावर अनेकांना कोमट पाणी पिण्याची सवय असते. सकाळी नियमित कोमट पाणी प्यायल्यामुळे तुमचं पोट साफ होण्यास मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये चिमूटभर हिंग मिसळून प्यायल्यामुळे तुमच्यया आरोग्याला अनेक फायदे होतात. निरोगी आरोग्यासाठी हिंगाचे सेवन खुप फायदेशीर ठरते.

रिकाम्या पोटी हिंगाच्या पाण्याचे फायदे :

सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी हिंगाचे पाणी प्यायल्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्यासोबतच हिंगाच्या पाण्यामुळे तुमचं अन्न पचण्यास मदत होईल. तुम्हाला जर बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्या असतील तर तुम्ही हिंगाच्या पाण्याचे सेवन करू शकता. हिंगामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-स्पास्मोडिक गुणधर्म असतात ज्यामुळे तुमच्या पोटामधील स्नायू शांत होण्यास मदत होते. त्यासोबतच तुम्हाला जर पोटदुखीसारख्या समस्या असतील तर हिंगाचे पाणी फायदेशीर ठरतात. हिंगामध्ये भरपूर प्रमाणात विषाणूविरोधी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात ज्यामुळे तुम्हालासर्दी, खोकला यांच्यासारखे संसर्गाचे आजार होत नाहीत. त्यासोबतच हिंगामध्ये भरपूर प्रमाणात खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात ज्यामुळे तुमच्या शरीराला उर्जा मिळते आणि अशक्तपणा आणि थकवा दूर होण्यास मदत होते.

हिंगाचे पाणी प्यायल्यामुळे मासिक पाळी दरम्यान होणारे वेदना कमी होण्यास मदत होते. तुम्हाला जर उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर तुमच्यासाठी रिकाम्यापोटी हिंगाचे पाणी पिणं फायदेशीर ठरू शकते. हिंगाचे पाणी प्यायल्यामुळे चयापचय वाढवते, आणि तुमचं वजन कमी होण्यास मदत होते. तुम्हाला जर कोणत्याही प्रकारचे त्वचेसंबंधीत आजार असतील तर हिंगाचे पाणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरते. हिंगाच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे तुमच्या केसांचे आरोग्य निरोगी राहाते आणि केसांना अधिक चमकदार होण्यास मदत करते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;