Human Metapneumovirus: आतापर्यंत HMPV चे देशात 6 रुग्ण, केंद्र सरकार सतर्क

Human Metapneumovirus: आतापर्यंत  HMPV चे देशात 6 रुग्ण, केंद्र सरकार सतर्क

एकीकडे चीन डिजीटल क्षेत्रात वेग पकडत आहेत. तर दुसरीकडे त्याच देशात ह्युमन मेटान्यूमो व्हायरस वेगाने पसरू लागला आहे. अश्यातच भारतात सुद्धा या व्हायरसचे रुग्ण सापडू लागले आहेत. देशात आतापर्यंत ६ बाधित रुग्ण आढळले आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये या व्हायरसची लागण लहान मुलांना होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये अहमदाबादमध्ये १, बेंगळुरूमध्ये २, चेन्नईत २ आणि कोलकात्यात १ अश्या लहान मुलांना ह्युमन मेटान्यूमोव्हायरसची (एचएमपीव्ही) लागण झाली आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून एक मोठं वक्तव्य करण्यात आलं आहे. या व्हायरसला सामोरे जाण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

या व्हायरस बाबत घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्र सरकारने देखील लोकांना सांगितले आहे. या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने राजधानीतील सर्व रुग्णालयांना त्याचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज राहण्यास सांगितले आहे.

संक्रमणाबाबत मंत्रालय काय म्हणाले?

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांच्या मुलीला ब्रॉन्कोन्यूमोनियाची लागण झाली होती. दरम्यान कुटुंबीयांनी मुलीला बेंगळुरूयेथील रुग्णालयात दाखल केले असता त्यांना एचएमपीव्हीची लागण झाल्याचे समजले. त्यानंतर तेथील रुग्णालयात उपचाराकेल्यानंतर त्या लहान मुलीला घरी सोडण्यात आले. त्यानंतर आणखी एका आठ महिन्याच्या लहान मुलाला ब्रॉन्कोन्यूमोनियाची लागण झाली. या लहान मुलाला 3 जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्याची एचएमपीव्ही टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. दरम्यान योग्य उपचारामुळे बाळ आता संसर्गातून बरे झाले आहे. दोन्ही मुलांचा आंतरराष्ट्रीय प्रवासा नसल्याचे देखील सांगितले आहे.

गुजरातमधील अहमदाबाद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या दोन महिन्यांच्या बाळालाही एचएमपीव्हीची लागण झाली आहे. हा मुलगा राजस्थानमधील डूंगरपूरचा रहिवासी आहे. श्वसनाच्या संसर्गाची लक्षणे आढळल्याने लहान मुलाला २४ डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला या बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. योग्य उपचारानंतर बाळाची प्रकृती स्थिर आहे.

तामिळनाडूच्या प्रकरणांबाबत आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, चेन्नईमध्ये 2 मुलांमध्ये ह्युमन मेटान्यूमोव्हायरसची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून दुसरीकडे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की, एचएमपीव्ही आधीच भारतासह जगातील अनेक देशांमध्ये आहे. मंत्रालय त्याच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाहीये असे देखील सांगण्यात आलेले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;