हिवाळ्यात तूप आणि गूळ खाण्याचे अनेक फायदे ऐकुन व्हाल थक्क…

हिवाळ्यात तूप आणि गूळ खाण्याचे अनेक फायदे ऐकुन व्हाल थक्क…

वर्षानुवर्ष भारतीय स्वयंपाकघरांमध्ये गुळाचा आणि तूपाचा भरपूर प्रमाणात वापर केला जातो. गूळ आणि तूपाच्या वापरामुळे जेवणाची चवच वाढत नाही तर हे दोन्ही पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. आयुर्वेदानुसार, गूळ आणि तूप याच्या मिश्रणाचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीराला योग्य पोषण मिळते त्यासोबतच तुमच्या अनेक आजारांना दूर ठेवण्यास मदत करते. गूळ आणि तूप या दोन्ही पदार्थांमुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया हिवाळ्यात गूळ आणि तूपाचे एकत्र सेवन केल्यामुळे तुमच्या आरोग्याला नेमकं काय फायदे होतात.

आकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. नियमित आहार आणि योग्य व्यायम केल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. गूळ आणि तूप हे दोन्ही पदार्थ आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात. गूळ आणि तूपाचे एकत्र सेवन केल्यामुळे तुमचं पचन सुरळीत राहाण्यास मदत होते. गुळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि तूपामध्ये अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे दोघांचे एकत्र सेवन केल्यास बद्धकोष्ठता, गॅस आणि ऍसिडिटी यांच्या सारख्या समस्यांपासून आराम मिळतो. जेवणानंतर गूळ आणि तुपाचा छोटा तुकडा खाल्ल्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते.

गुळात आणि तूपामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन-ई, झिंक आणि अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. हिवाळ्यामध्ये संसर्गाच्या आजारांचा धोका भरपूर प्रमाणात असतो. त्यामुळे हिवाळ्यामध्ये तूपाचा आणि गुळाचा वापर करून लाडू तयारर केले जातात. या लाडूंचं सेवन केल्यामुळे तुम्हाला सर्दी, खोकला, ताप यांच्यासारख्या आजारांचा धोका टळतो. गुळ आणि तूप तुमच्या शरीरातील खराब फॅट काढून शरीर डिटॉक्सिफाय करण्यास मदत करते. तूप आणि गुळाच्या सेवनामुळे तुमच्या रक्तामधील विषारी पदार्थ निधून जातात आणि रक्ताचे शुद्धीकरणं होते. तूपाचे सेवन केल्यामुळे तुमच्य त्वचेच्या आरोग्याला देखील फायदे होतात.

गूळ आणि तूप खाण्याचे फायदे

तूपामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे तुमचे शरीर डिटॉक्सिफाय होते.

पिंपल्स, डागांच्या समस्या असल्यास तुमच्या आहारामध्ये तूपाचे सेवन करा.

तुम्हाला अपचनाचा त्रास असल्यास नियमित तूपाचे सेवन करा.

तूपाच्या आणि गुळाच्या सेवनामुळे तुमचे मुडस्विंग्स बंद होण्यास मदत होते.

हिवाळ्यात तूपाचे आणि गुळाचे सेवन केल्यामुळे तुम्हाला संसर्गाचे आजार होत नाहीत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;