कोरोनानंतर आता डिंगा-डिंगाचा धुमाकूळ, लक्षणं आहेत फारच विचित्र

कोरोनानंतर आता डिंगा-डिंगाचा धुमाकूळ, लक्षणं आहेत फारच विचित्र

Dinga Dinga Disease : कोरोनानंतर आता नवा आजार आला आहे. या आजारात रुग्ण नाचताना दिसतात. वाचून आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे. हा आजार भारतात नसून आफ्रिकेत आहे. आफ्रिकेतील काही भागात डिंगा डिंगा रोगाची प्रकरणे समोर येत आहेत. यामुळे पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्णाण झालं आहे. शरीरात जास्त थरथरल्यामुळे या आजाराचा रुग्ण खूप थरथरत राहतो, ज्यामुळे सीडीसीने या आजाराला डिंगा डिंगा म्हणजेच डान्सिंग डिसीज असे नाव दिले आहे.

आफ्रिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. किता ख्रिस्तोफर यांनी सांगितले की, सध्या या आजारावर अँटीबायोटिक्सद्वारे उपचार केले जात आहेत आणि अद्याप कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाही. हा आजार कसा आला आणि का पसरत आहे, याची नेमकी माहिती आरोग्य विभागाला अद्याप मिळालेली नाही.

मात्र, सद्यस्थितीत रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असून रुग्ण आठवडाभरात बरे होत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिलेल्या माहितीनुसार, येथे 394 रुग्णांची नोंद झाली आहे.

डिंगा तापाची लक्षणे कोणती?

ताप
डोकेदुखी
खोकला
नाक वाहणे अंगदुखी

‘हा’ आजार का पसरत आहे?

आफ्रिकेचा आरोग्य विभाग डिंगा, डिंगा रोगाचा प्रादुर्भाव कशामुळे झाला याचा शोध घेत आहे. इन्फ्लूएन्झा, कोविड-19, मलेरिया किंवा गोवर यांसारखे संसर्ग या आजाराला कारणीभूत आहेत का, याचा तपास केला जात आहे, परंतु डिंगाच्या प्रसाराचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ज्या भागात हा आजार पसरत आहे, तेथील लोकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. हा रोग संसर्गजन्य मानला जातो आणि तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होण्याची भीती आहे.

मंकीपॉक्सपाठोपाठ डिसीज एक्सची प्रकरणे

आफ्रिकेत गेल्या तीन महिन्यांत या आजाराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. मंकीपॉक्सपाठोपाठ एक्स या आजाराचेही रुग्ण येत असून अनेक रुग्णांचा यामुळे मृत्यूही झाला आहे. आता डिंगा, डिंगा या आजाराच्या आगमनानंतर धोका अधिकच वाढला आहे. या आजाराबाबत लोकांना सतर्कही केले जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;