Cancer Medicine : मोठी आनंदवार्ता, कॅन्सर छुमंतर होणार, रामबाण औषधाचा पर्याय, काय आहे रशियाचा दावा, किंमत वाचून दंग व्हाल…

Cancer Medicine : मोठी आनंदवार्ता, कॅन्सर छुमंतर होणार, रामबाण औषधाचा पर्याय, काय आहे रशियाचा दावा, किंमत वाचून दंग व्हाल…

कॅन्सर सारख्या गंभीर आजाराबाबत रशियाने मोठा दावा केला आहे. कॅन्सरवर रामबाण उपाय शोधल्याचा दावा रशियाने केला आहे. कॅन्सरवर लस तयार केल्याचा दावा करण्यात येत आहे. जगभरातील सर्व रुग्णांना ही लस मोफत देण्याचा दावा या देशाने केला आहे. या नवीन संशोधनामुळे कॅन्सर पीडितच नाही तर त्यांचे नातेवाईक, आप्तेष्ट यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जगात कॅन्सरचा विळखा वाढत असताना हे संशोधन बहुमोल ठरले आहे. लवकरच जगभरात हे औषध पोहचवण्यात येणार आहे. या औषधांचं नाव काय अथवा त्याचा वापर कसा करणार याविषयीची माहिती अद्याप रशियाने दिली नाही. पण ही लस शरिरातील कॅन्सरचा प्रभाव निष्प्रभ करते आणि त्याचा फैलाव होऊ देत नाही असे समोर येत आहे.

पुढील वर्षाच्या सुरुवातीला लस येणार

रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने केलेल्या दाव्यानुसार, कॅन्सर विरोधात ही एक लस आहे. ही लस 2025 च्या सुरुवातीलाच बाजारात आणण्यात येणार आहे. रशियातील कॅन्सर रुग्णांना ही लस मोफत देण्यात येणार आहे. जगभरात ही लस किती रुपयांना देण्यात येणार याविषयीची माहिती समोर आलेली नाही. रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे प्रमुख अँड्री काप्रिन यांनी या लसीविषयी माहिती दिली आहे. ही लस कॅन्सरवर किती प्रभावी ठरणार, कोणत्या कॅन्सरवर गुणकारी ठरणार याविषयीची माहिती समोर आलेली नाही. कोणत्या वयाच्या रुग्णांवर त्याचा अधिक प्रभाव दिसेल याविषयीची माहिती काही दिवसात समोर येईल.

रशियात पण रुग्णांची मोठी संख्या

या वॅक्सिनचे, लसीचे नाव अद्याप समोर आलेले नाही. जगातील इतर देशांप्रमाणेच रशियात पण कॅन्सर ही मोठी समस्या आहे. कॅन्सरचे रूग्ण सातत्याने वाढत आहेत. 2022 मध्ये 6,35,000 हून अधिक रुग्णांची नोंद या काळात झाली आहे. या देशात स्तन, फुप्फुसांचा कर्करोग वाढला आहे. ही लस केवळ ट्युमरची गती कमी करणार नाही तर तिचा आकार सुद्धा कमी करेल.

काय होता पुतिन यांचा दावा?

काही दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी वैज्ञानिक कर्करोगावरील लस तयार करण्यात रशिया अगदी जवळ असल्याचा दावा केला होता. नवीन पिढीच्या इम्युनोमोड्युलेटरी औषधाची निर्मिती करत असल्याचे ते म्हणाले होते. इम्युनोमोड्युलेटरी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं औषध. ही लस शरीराला कर्करोग, संसर्ग अथवा इतर रोगांशी लढण्यास मतद करणारी असेल असा दावा आहे. मॉस्को फोरम ऑन फ्यूचर टेक्नॉलॉजीच्या मंचावरून त्यांनी या लसबद्दल घोषणा केली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;