हिवाळ्यात वारंवार लघवी लागते ? जाणून घ्या त्यावरील उपाय

हिवाळ्यात वारंवार लघवी लागते ? जाणून घ्या त्यावरील उपाय

हिवाळा सुरू होऊन आता काही दिवस झाले आहेत. हिवाळ्यात आरोग्याच्या समस्या आणि त्वचे संबंधित समस्या निर्माण होत असतात. हिवाळ्यात शरीराची आणि त्वचेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. त्यासोबतच हिवाळ्यात आणखीन एक समस्या निर्माण होते ती म्हणजे पुन्हा पुन्हा लघवीला जाणे.

हिवाळ्यामध्ये एकदा पांघरून घेऊन झोपल्यानंतर कशासाठीही उठावे वाटत नाही पण लघवीसाठी मात्र अनेक वेळा उठावे लागते. अनेक लोकांचे असे म्हणणे आहे की उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात जास्त लघवी येते विशेषतः रात्री झोपल्यानंतर. सारखे सारखे लघवीला उठल्यानंतर झोप मोड होते आणि नंतर झोप लागत नाही शिवाय थंडीत बाहेर गेल्याने तब्येत बिघडण्याची शक्यता ही निर्माण होते. जर तुम्ही ही हिवाळ्यात या समस्येमुळे त्रस्त असाल तर जाणून घेऊया काही आश्चर्यकारक टीप ज्यामुळे तुमची ही समस्या कमी होईल.

हिवाळ्यात वारंवार का येते लघवी?
उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात जास्त लघवी होते असे अनेक लोकांचे म्हणणे आहे. तुम्ही अनेकदा ऐकले असेल कदाचित तुम्हालाही हे जाणवले असेल पण असे का होते याचे उत्तर तुम्हालाही माहिती नसेल. खरंतर जसजसा हिवाळा वाढत जातो तसे तसे योग्य तापमान राखण्यासाठी आपल्या शरीरात जास्त प्रमाणात रक्ताभिसरण सुरू होते. आपल्याला जेव्हा जास्त थंडीत जाणवते तेव्हा आपले हृदय सामान्य स्थिती पेक्षा वेगाने रक्ताभिसरण करू लागते. यामुळे किडनी सारखे आपले इतरही अवयव वेगाने काम करू लागतात. त्यामुळे वारंवार लघवीची समस्या उद्भवते. जाणून घेऊया ही समस्या कमी करण्यासाठी काही टिप्स.

वारंवार येणारी लघवी कशी थांबवावी?

हिवाळ्यात अनेक जण वारंवार लघवी येण्याच्या समस्येने त्रस्त असतात. वारंवार लघवी येऊ नये यासाठी अनेक जण पाणी कमी पितात. तर हे करणे अजिबात योग्य नाही. उन्हाळा, हिवाळा किंवा पावसाळा कोणताही ऋतू असला तरी शरीराला हायड्रेट ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अशा परिस्थितीत तुम्ही इतर काही गोष्टी लक्षात ठेवू शकता.

हिवाळ्यात सामान्य पाणी पिण्यापेक्षा तुम्ही थोडे पाणी कोमट करून पिऊ शकतात. याशिवाय शरीर उबदार ठेवण्यासाठी विशेषतः कान झाकून ठेवा. चहा आणि कॉफी सारख्या कॅफिन युक्त पदार्थांचा वापर कमी प्रमाणात करा. याशिवाय रात्री गरम दुधासोबत हळद, केशर, दालचिनी आणि अंजीर चे सेवन करा. तुमची खोली आणि घर शक्य होईल तितके उबदार ठेवण्याचा प्रयत्न करा. या सर्व गोष्टींसह तुम्ही तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित करू शकता. ज्यामुळे वारंवार बाथरूमला जाण्याच्या समस्येपासून तुम्हाला आराम मिळू शकेल.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;