तुमचाही गुळाचा चहा फाटतो का? ‘या’ कमाल ट्रिकने बनवा फक्कड गुळाचा चहा

तुमचाही गुळाचा चहा फाटतो का? ‘या’ कमाल ट्रिकने बनवा फक्कड गुळाचा चहा

चहा म्हटलं की सर्वांच्याच आवडीचा विषय. ‘चहा हवाय का?’ असं विचारल्यावर कदाचितच कोणी नको म्हणत असेल. प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने चहा बनवतात. मग तो साखरेचा असो, विनासाखरेचा असो, लेमन टी असो, किंवा ब्लॅक टी असो, पण चहा हवाच. त्यात तर आता हिवाळा सुरु झाला आहे.

फक्कड गुळाचा चहा कसा बनवायचा?

त्यामुळे गरम कडक चहा पिण्याती तलफ सर्वांनाच येत असते. पण ज्यांना साखरेचा चहा घ्यायचा नसेल तर ते चहाप्रेमी गुळाचा चहा घेणं पसंत करतात. पण गुळाचा चहा बनवताना अडचण असते ती म्हणजे तो चहा फाटतो.

गुळाचा चहा बनवणं शक्यतो थोडं अवघड वाटू शकतं,त्यामुळे शक्यतो लोकं तो चहा करणं टाळतात. मात्र तुम्हाला माहितीये का की, गुळाचा चहा बनवण्याची एक कमाल ट्रीक आहे. ही ट्रीक जर तुम्ही वापरलीत ना तर 100 टक्के तुमचा चहा न फाटता अगदी परफेक्ट बनेल. चला जाणून घेऊयात ती कमाल ट्रीक कोणती आहे ती.

असं म्हणतात की, थंडीच्या दिवसांत गुळाच्या चहाचे सेवन तब्येतीसाठी फार फायदेशीर ठरते. काही सोपे उपाय करून चुटकीसरशी गुळाचा चहा कसा बनवायचा ते पाहू.

गुळाचा चहा बनवण्यासाठी लागणारं साहित्य

गुळाचा चहा करण्यासाठी 1 कप दूध, 1 कप पाणी, अर्धा चमचा ओवा, 1 इंच आलं, 1 छोटी वेलची, 2 तुळशीची पानं, अर्धा चमचा चहा पावडर आणि किसलेला गूळ.

कृती
गुळाचा चहा करण्यासाठी सगळ्यात आधी भांड्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात किसलेला गुळ, किसलेलं आलं, बारीक केलेली वेलची किंवा वेलची पूड, तुळशीची पानं जर तुम्हाला हवं असेल तर, आणि चहा पावडर घालून उकळवून घ्यायचं आहे. गूळ पाण्यात व्यवस्थित वितळल्यानंतर गॅस बंद करायचा.

त्यानंतर हा उखळलेला चहा एका कपमध्ये गाळून घ्यायचा आणि नंतर त्यात तुम्हाला जितकं हवं आहे तेवढं पण गरम दूध त्या गाळलेल्या कोऱ्या चहामध्ये मिक्स करायचं आहे. झाला तुमचा गुळाचा फक्कड चहा.

चहा फाटू नये यासाठी खास टिप्स

आता पाहुयात की चहा बनवताना काय चुका करायच्या नाहीयेत त्या. जेणेकरून तुमचा गुळाचा चहा न फाटता छान होईल.

1) यातील पहिली चूक म्हणजे गुळाचा चहा करताना अनेकदा लोक एकत्र सर्व साहित्य घालतात. ज्यामुळे गुळाचा चहा फाटतो.

2) खासकरून चहात गूळ आणि दूध एकत्र अजिबात घालू नये.

3) गुळाच्या चहात थंड दूधही मिक्स करणं करणं टाळा.

या टिप्स फॉलो केल्यास गुळाचा चहा कधीच फाटणार नाही.

गुळाचा चहा पिण्याचे फायदे

1) हिवाळ्याच्या दिवसांत तुम्ही दिवसांतून २ वेळा गुळाचा चहा पिऊ शकता.

2) नियमित गुळाचा चहा प्यायल्यानं इम्यूनिटी मजबूत होते.

3) शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते आणि वजन कमी करण्यासही मदत होते.

 

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;