हिवाळ्यात डोळे दुखणे, जळजळ होतेय? ही ‘या’ आजारांची लक्षणे, अशी घ्या काळजी

हिवाळ्यात डोळे दुखणे, जळजळ होतेय? ही ‘या’ आजारांची लक्षणे, अशी घ्या काळजी

हिवाळ्यात थंड वातावरणामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अश्यात आपण अनेक उपाय करत असतो ज्याने आपल्याला त्या समस्येपासून सुटका मिळते. तर या थंडीच्या दिवसात तुम्हाला डोळ्यांचे अनेक आजार होण्याचा धोका असतो. कारण या दिवसात थंड वातावरणामुळे डोळ्यांची त्वचा कोरडी पडते त्यामुळे तुम्हाला डोळ्यात दुखणे, डोळे लाल होणे, पाणी येणे किंवा तीव्र वेदना होऊ शकतात. तर तुम्ही या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. हे डोळ्याच्या काही आजाराचे लक्षण असू शकते. लक्षणे वेळीच ओळखून त्यावर उपचार केल्यास डोळ्यांचा कोणताही गंभीर आजार सहज टाळता येतो. हिवाळ्यात डोळ्यांच्या कोणत्या आजारांना धोका असतो आणि त्यापासून बचाव कसा करावा याबद्दल तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात.

दिल्लीतील नानक आय हॉस्पिटलमधील डॉ. अन्नू कपूर सांगतात की, हिवाळ्यात डोळ्यांमध्ये अनेक आजार होण्याचा धोका असतो. या ऋतूत डोळ्यातील कंजंक्टिवाइटिस पासून ते ब्लेफेराइटिसपर्यंतचे आजार डोळ्यांमध्ये होऊ शकतात. कंजंक्टिवाइटिस हा डोळ्यांचा एक सामान्य आजार आहे जो हिवाळ्यातही होऊ शकतो. यात डोळ्यांना सूज येणे, पाणी येणे अशी लक्षणे आढळतात. या आजारावर वेळीच नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे, नाहीतर खूप त्रास होऊ शकतो.

सिंड्रोम रोगाचा धोका होऊ शकतो

ब्लेफेराइटिसबद्दल बोलायचे झाले तर हा डोळ्यांचा आजार आहे ज्यामध्ये डोळ्यांच्या पापण्यांना सूज येऊ शकते. हिवाळ्यात ही एक सामान्य समस्या आहे, परंतु ती दूर करणे आवश्यक आहे. डॉ. अन्नू सांगतात की, डोळ्यांचे कोरडे पडल्याने हे सिंड्रोम रोगाचा धोका हिवाळ्यात होतो. हवेतील ओलावा नसल्यामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा येऊ शकतो. डोळ्यात जळजळ, सूज येणे, पाणी येणे अशी समस्या उद्भवते. ही लक्षणे दिसत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

दिल्लीतील श्रीजीवन रुग्णालयातील नेत्र विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉ. अंकिता सभरवाल सांगतात की, या हिवाळ्यात डोळ्यांचे गंभीर आजारही होऊ शकतात. रेटिना डिटेचमेंटची समस्या देखील असू शकते. हा डोळ्यांचा आजार आहे ज्यामध्ये डोळ्यांचे रेटिना वेगळे केले जाते. हिवाळ्यात हा आजार अधिक आढळतो.

हिवाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी

डॉ. अंकिता यांनी डोळ्यांची काळजी घेण्याचे हे उपाय सांगितले आहेत. हिवाळ्याच्या या ऋतूत नियमितपणे डोळे स्वच्छ करा. थंडीच्या दिवसात कोमट पाण्याने डोळे धुवा. या ऋतूत तुम्हाला डोळ्यांसंदर्भांत कोणती हि समस्या निर्माण झाली असेल तर डोळ्यांची तपासणी करून डोळ्यांचे आजार ओळखता येतात. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डोळ्यांमध्ये आय ड्रॉप टाका. अश्याने तुमच्या डोळ्यांची योग्य काळजी घ्या.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;