बदलापुरात अतिसारामुळे चिमुकलीचा मृत्यू, एकाच कुटुंबातील 6 जणांना लागण

बदलापुरात अतिसारामुळे चिमुकलीचा मृत्यू, एकाच कुटुंबातील 6 जणांना लागण

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. त्यातच दिवसा उकाडा आणि रात्री थंडी यामुळे अनेकांना सर्दी, खोकला, ताप असे आजार होताना दिसत आहे. वातावरण बदल आणि प्रदूषणामुळे होणारे आजार तसेच त्यामुळे वाढणाऱ्या रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. त्यातच आता हिवाळा सुरु झाल्याने श्वसनाचे आजार वेगाने वाढत आहे. यातच आता बदलापुरात अतिसारामुळे एका अडीच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरच्या सोनिवली परिसरातील आदिवासी वाडीत गौऱ्या मिरकुटे कुटुंबासह राहतात. त्यांच्या घरातील ६ मुलांना दोन दिवसांपूर्वी अचानक उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यांची अडीच वर्षाची मुलगी सपना मिरकुटे ही मोठ्या प्रमाणात अतिसार झाला. तिला याचा जास्त त्रास झाला आणि तिची प्रकृती बिघडली.

यानंतर तिला उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर कुटुंबातील इतर ५ मुलांनाही उपचारांसाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्या पाच मुलांची प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान सध्या अतिसाराची साथ सुरू असून अनेक लहान मुलांना जुलाब उलट्या असे त्रास होत आहे. हा आजार दूषित पाण्यातून होत असल्याचे बोललं जात आहे. बदलापूरच्या चिमुकलीचाही मृत्यू दूषित पाण्यामुळेच झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अतिसार म्हणजे काय?

अतिसार किंवा जुलाब हा एक संसर्गजन्य आजार आहे, जो खराब खाण्याच्या सवयी किंवा दूषित पाणी पिण्यामुळे होऊ शकतो. अतिसारामुळे सैलसर पाण्यासारखे पातळ शौचास होणे, पोटात मुरड पडणे किंवा गोळा येणे, मळमळ आणि उलट्या होणे, ताप, थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, अशी लक्षणे दिसतात.

अतिसार झाल्यास काय करावे?

  • अतिसाराच्या वेळी शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ORS चे सेवन करा.
  • केळी खाल्ल्याने पोटदुखी आणि अतिसारापासून आराम मिळतो
  • निरोगी पोटासाठी रोज दह्याचे सेवन करणे फायदेशीर असते.
  • आल्याचा रस प्यायल्याने पोटदुखीपासून आराम मिळतो

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;