Carrot Benefits: हिवाळ्यात रोज एक गाजर खा, पाहा किती आजार पळणार लांब
गाजरच्या भाजीसोबत गारजचा हलवा, लोंच, मुरब्बा, पाक, सलाद, ज्यूस असे विविध प्रकाराच्या माध्यमातून गाजर खाता येतो. गाजरमध्ये मुबलक प्रमाणात बीटा कॅरोटीन आणि एंटीऑक्सीडेंट आहे. अर्धा कप गाजरमध्ये 25 ग्रॅम कॅलरीज, 6 ग्रॅम कार्बोहाइड्रेट, 2 ग्रॅम फायबर, 3 ग्रॅम साखर आणि 0.5 ग्रॅम प्रथिने असतात.
गाजरात बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात असते. हे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे गाजर खाल्याने वाढत्या वयामुळे डोळ्यांच्या निर्माण होणाऱ्या आजारांपासूनही सुटका मिळते. बीटा-कॅरोटीनसोबतच व्हिटॅमिन सी देखील गाजरात मुबलक प्रमाणात आहे.
गाजरात आढळणारे कॅरोटीन नावाचे पोषक तत्व रातांधळेपणाच्या समस्येपासून सुटका मिळते. गाजरचे सेवन केल्यामुळे ह्रदयाला त्याचा फायदा होतो. त्यामुळे ह्रदयविकार होण्याचा धोका कमी होतो. गाजरात आढळणारे पोटॅशियम हे खनिज शरीरातील सोडियमचे प्रमाण संतुलित करते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List