कोरड्या त्वचेसाठी बदामाचे तेल ठरेल फायदेशीर, त्वचा होईल मॉइस्चराइज आणि ग्लोइंग

कोरड्या त्वचेसाठी बदामाचे तेल ठरेल फायदेशीर, त्वचा होईल मॉइस्चराइज आणि ग्लोइंग

हिवाळ्याच्या ऋतूत उष्णतेपासून आराम मिळतो. त्याचवेळी ते त्वचेच्या अनेक समस्या देखील घेऊन येते. कारण या ऋतूत वाहणारे कोरडे आणि थंड वारे त्वचेसाठी चांगले नसतात. त्यामुळे मुरूम आणि कोरड्या त्वचेच्या समस्या वाढतात. म्हणून हिवाळ्यात चेहरा नेहमी मॉइश्चराइज ठेवावा लागतो. रासायनिक क्रीम व्यतिरिक्त आपण आपल्या चेहऱ्यावर ओलावा टिकवून ठेवण्यासाठी घरगुती उपाय देखील करू शकतो. असे एक तेल आहे. जे क्रीम ऐवजी लावल्यास त्याचे फायदे दुप्पट होऊ शकतात. जाणून घेऊया असे कोणते तेल आहे जे हिवाळ्यात तुमच्या त्वचेची काळजी घेणे अधिक सोपे करू शकते.

बदामाच्या तेलाने करा त्वचा मॉइश्चराइज

हिवाळ्यात त्वचा मुलायम ठेवण्यासाठी तुम्ही बदामाचे तेल चेहऱ्यावर लावू शकता. यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई हे पोषक तत्व त्वचेला हॅड्रेट ठेवण्यास खूप मदत करते. हिवाळ्यासाठी हे सर्वोत्तम फेस ऑइल आहे.

बदाम तेल लावण्याची योग्य पद्धत

कोमट पाण्याने चेहरा धुतल्यानंतर बदामाचे तेल थेट त्वचेवर लावा. हे तेल त्वचेतील आद्रता लॉक करण्यास मदत करते.

मास्क बनवून लावा

हा मास्क तयार करण्यासाठी तुम्ही एक चमचा बदाम तेल, एक चमचा मध आणि लिंबाचे काही थेंब घालू शकता. हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला खोल ओलावा मिळतो आणि मुरूमही कमी होतात. हा मास्क लावून 15 ते 20 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आद्रता टिकून राहते आणि डागही पुसट होतात.

बदाम तेलात असलेले पोषक घटक

बदामाच्या तेलात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात जसे की चरबी, प्रथिने, कर्बोदके, फॉस्फरस, कॅल्शियम, लोह, जस्त, तांबे, मॅगनीज, मॅग्नेशियम, पोटॅशियम, ओमेगा फॅटी ऍसिड इ. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी असते ज्यामुळे त्वचा आणि केस दोन्ही निरोगी राहतात.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;