बनावट आणि भेसळ युक्त मनुके असे ओळखा, जाणून घ्या योग्य पद्धत

बनावट आणि भेसळ युक्त मनुके असे ओळखा, जाणून घ्या योग्य पद्धत

मनुके हे पोषक तत्वांचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. जे आपल्या एकूण आरोग्यासाठी आणि शरीरासाठी फायदेशीर आहे. त्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. याचे पचन सुधारणास आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करतात. मनुक्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोहसारखी जीवनसत्वे तसेच खनिज देखील असतात. जे अनेक शारीरिक कार्यांसाठी आवश्यक असतात. पोटॅशियम रक्तदाब, हृदय गती आणि स्नायूंच्या कार्यांचे नियमन करण्यास मदत करते. मॅग्नेशियम हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करण्यास मदत करू शकते.

मनुक्यामध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. लाल रक्त पेशींच्या निर्मितीसाठी लोह महत्त्वाचे आहे आणि अशक्तपणा टाळण्यास मदत करू शकते. पण बाजारात अनेक प्रकारचे बनावट मनुके उपलब्ध आहेत जे फायदेशीर नसून आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. बाजारातून मनुके विकत घेताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात जेणेकरून नकली मनुके ओळखता येतील.

नकली मनुके बाजारात उपलब्ध आहेत ज्याची चमक आणि आकार तुम्हाला गोंधळात टाकू शकतो. या मनुक्यांवर बनावट रंग आणि रसायने विक्रीसाठी लावली जातात. त्यामुळे ते चमकदार दिसतात आणि त्यांची विक्री वाढते.

बनावटी मनुके कसे ओळखावे?

बनावट किंवा रासायनिक मनुके ओळखण्यासाठी काही मनुके घ्या आणि आपल्या तळहातावर घासून बघा. मनुक्यांचा रंग सुटत असेल किंवा वास येत असेल तर हे मनुके भेसळयुक्त आहे आणि ते खाल्ल्याने तुम्ही आजारी पडू शकतात. बनावटी मनुके खाल्ल्याने जुलाब, उलट्या आणि पचनाच्या इतर समस्या होऊ शकतात.

मनुके खाण्याचे फायदे

मनुके देखील अँटिऑक्सिडंटचा चांगला स्त्रोत आहे. जे शरीराला मुक्त रॅडिकल्स मुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करू शकतात. मुक्त रॅडिकल्स हे अस्थिर रेणू आहेत जे पेशींना नुकसान पोहोचवू शकतात आणि कर्करोग, हृदयरोग तसेच अल्झायमर रोग यासारख्या जुनाट आजारांपासून वाचवण्यास मदत करतात.

मनुक्यामध्ये फायबर जास्त असते जे पचन क्रिया सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करते. मनुक्यामध्ये सॉर्बिटॉल आणि डिहायड्रोफेनिलालानिन सारखे नैसर्गिक रेचक देखील असतात. जे बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;