कडुलिंब आणि हळदीमुळे कॅन्सर बरा होतो, असा सिद्धूचा दावा; टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणाले…

कडुलिंब आणि हळदीमुळे कॅन्सर बरा होतो, असा सिद्धूचा दावा; टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे डॉक्टर म्हणाले…

माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पत्नीला स्टेज 4 चा कॅन्सर झाला होता. कडुलिंब, हळद, लिंबू आणि आवळा यांचा आहारात वापर करून त्या पूर्णपणे कॅन्सरमुक्त झाल्याचा दावा नवज्योतसिंग सिद्धू यांनी केला आहे. घरगुती उपचारांनी त्या पूर्णपणे बऱ्या झाल्याचं नवज्योतसिंग सिद्धू यांचं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेक कर्करोग रुग्ण त्यांच्या डॉक्टरांना आयुर्वेदिक उपचार करण्याबाबत विचारणा करत आहेत. त्यामुळे डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. इतकंच काय देशातील नामांकित असं कॅन्सर रुग्णावर उपचार करणाऱ्या टाटा मेमोरियेल रुग्णालयातील 200हून अधिक डॉक्टरांनी लोकांना आवाहन करणारं एक पत्र जारी करावं लागलं आहे. या पत्रात त्यांनी लिहिलं आहे की, माजी क्रिकेटपटू यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात ते आपल्या पत्नीच्या स्तनाच्या कॅन्सरबाबत सांगत आहेत. व्हिडीओतील काही भागात त्यांनी आहाराचा उल्लेख केला आहे. डेअर उत्पादनं आणि साखर खाणं बंद केलं. तसेच उपचारासाठी कडुलिंब आणि हळदीचा वापर आहारात केला. त्याच्या मदतीने कॅन्सर बरा होण्यास मदत झाली. याबाबत डॉक्टरांनी पत्रात लोकांना आवाहन केलं आहे.

डॉक्टरांनी आपल्या आवाहानात्मक पत्रात लिहिलं आहे की, अशा दाव्याबाबत मेडिकल सायन्समध्ये कोणतंही प्रमाण नाही. अशा आयुर्वेदिक उपचारांवर संशोधन सुरु आहे. पण हळद आणि कडुलिंबामुळे कॅन्सर बरा होतो असं कुठेच सांगितलं गेलेलं नाही. त्यामुळे या दाव्यात काहीच तथ्य नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. कॅन्सरबाबत कोणतीही लक्षणं आढळल्यास डॉक्टर आणि कॅन्सर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. वेळीच निदान झाले तर कर्करोग बरा होऊ शकतो.

Tata_Doctor_Letter

फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनचे (एफएआयएमए) अध्यक्ष डॉ. सुवर्णकार दत्ता म्हणाले की, कॅन्सरच्या उपचाराबाबत चुकीची माहिती घातक ठरू शकते. कडुलिंब आणि हळद या गोष्टीत कॅन्सरविरोधी घटक असतात की नाही याबाबत संशोधन सुरु आहे. त्यामुळे सोशल मीडियावर येणाऱ्या अशा  वक्तव्यांवर विश्वास ठेवू नका. अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं. कर्करोगाचं योग्यवेळी निदान करा आणि वेळीच उपचार करा. उशीर केल्यास जीवावर देखील बेतू शकतं. सोशल मीडियावर विश्वास न ठेवता कॅन्सर तज्ज्ञांचा सल्ला घ्या, असंही डॉ. सुवर्णकार दत्ता यांनी सांगितलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;