चिया सीड्स रात्रभर भिजवणे खरंच आवश्यक आहे का? जाणून घ्या

चिया सीड्स रात्रभर भिजवणे खरंच आवश्यक आहे का? जाणून घ्या

चिया सीड्सला सुपर फूड म्हणून ओळखले जाते. चिया सीड्स हे अत्यंत फायदेशीर आहे. जे अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असून त्याचा अधिक फायदा वजन कमी करण्यासोबतच त्वचेला आणि केसांना देखील होतो.

चिया सीड्स भिजवल्यामुळे त्याचा आकार वाढतो. ते भिजल्यानंतर जेल सारखे बनतात. भिजवून खाल्ल्याने ते सहज पचतात आणि शरीर त्यांचे पोषक तत्व चांगल्या प्रकारे शोषून घेते. तुम्ही सुद्धा चिया सीड्स रात्रभर भिजवून ठेवत असाल तर तुम्हाला हे समजून आश्चर्य वाटेल की चिया सीड्स रात्रभर भिजवून ठेवण्याची आवश्यकता नाही. 15 ते 20 मिनिटे जरी भिजवले तरी पुरेसे आहे. भिजल्यानंतर ते जेली सारखे बनतात. ह्याचा वापर तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांमध्ये करू शकतात.

रात्रभर भिजवण्याची आवश्यकता नाही

तुम्हाला चिया सीड्सचे सेवन लवकर करायचे असेल आणि तुम्ही ते रात्री भिजवायला विसरला असाल तरीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. कारण कोणताही पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही एक टेबलस्पून चिया सीड्स, तीन टेबलस्पून पाण्यात किंवा दुधात मिसळून काही मिनिटे भिजू द्या चिया सीड्स हे पाणी शोषून घेतील आणि त्याचे रूपांतर जेलमध्ये होईल. त्यानंतर तुम्ही ते दही, स्मृती किंवा दलिया मध्ये वापरू शकता.

चिया सीड्स भिजवणे का महत्त्वाचे आहे

चिया सीड्स भिजवून ठेवणे खूप फायदेशीर आहे. हे केवळ खाण्यास सोपे बनवते असे नाही तर त्याचे पोषक तत्वे आपल्या शरीरात सहजपणे शोषल्या जातात.

पोट भरते

चिया सीड्स पाण्यात भिजवल्यानंतर त्यांच्या वजनाच्या दहा ते बारा पट त्या पाणी शोषून घेतात.ज्यामुळे त्या खूप भरतात भिजल्यामुळे त्यांची फुगण्याची क्षमता वाढते. त्याने सेवन केल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही.

पचनासाठी फायदेशीर

चिया सीड्स भिजवल्यामुळे त्यांचे बाह्य कवच मऊ होते त्यामुळे ते पचायला सोपे होतात. वाळलेल्या चीया सीड्स थेट खाल्ल्यास त्या पचन मार्गातून पाणी शोषून घेतात ज्यामुळे अस्वस्थता वाटते आणि सूज येऊ शकते.

पोषण तत्वांचे योग्य सेवन

चिया सीड्स भिजवल्याने त्याचे बाह्य कवच जेल सारखे बनते. ज्यामुळे शरीरातील पोषक द्रव्ये सहज शोषली जातात .यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंटचा समावेश असतो. जे भिजवल्यानंतर अधिक फायदेशीर ठरतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;