हिवाळ्यात बाजरी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे

हिवाळ्यात बाजरी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आजकालच्या आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहे. मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार असे अनेक आजार आपल्या जीवनावर परिणाम करता आहे. या समस्यांना तोंड देण्यासाठी आपल्याला आपल्या आहारात काही बदल करणे आवश्यक आहे. हा बदल तुम्ही तुमच्या पोळीनेही करू शकता.

आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेली पोळी खातो पण त्याऐवजी बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीरात अनेक बदल दिसून येतात. पंधरा दिवस सतत बाजरीची भाकरी खाल्ल्याने कोणते फायदे होतात ते जाणून घेऊ.

बाजरी हे एक सुपर फूड आहे.जे शतकानूशतके भारतात खाल्ले जाते. यामध्ये फायबर, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. बाजरीत असलेले फायबर पचन संस्थेला निरोगी ठेवण्यास मदत करते आणि वजन कमी करण्यासही मदत करते.

बाजरीची भाकरी खाण्याचे फायदे

वजन कमी करते: बाजरीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते. त्यामुळे तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते हे तुम्हाला जास्त अन्न खाण्यापासून प्रतिबंधित करते आणि वजन कमी करण्यास मदत करते.

रक्तातील साखर नियंत्रित करते: बाजरीमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे. याचा अर्थ ते रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढवते यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

पचनसंस्था निरोगी ठेवते: बाजरीत असलेले फायबर पचन संस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. त्यामुळे बद्धकोष्ठता ऍसिडिटी आणि अपचन सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर: बाजरीत अँटिऑक्सिडंट असतात जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. अँटिऑक्सिडंट केसांना चमकदार बनवण्यासाठी सुद्धा मदत करतात.

हृदयाचे आरोग्य सुधारते: बाजरीत असलेले मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करतात.

हाडे मजबूत करते: बाजरीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असते. जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात

लक्षात ठेवा

बाजरी आरोग्यासाठी कितीही फायदेशीर असली तरीही बाजरी संतुलित आहाराचा एक भाग असावा. तुम्हाला काही शारीरिक समस्या असेल तर बाजरीचे सेवन करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;