हिवाळ्यात आले आणि दालचिनीचा काढा प्यायल्यास काय होईल?, जाणून घ्या रेसिपी

हिवाळ्यात आले आणि दालचिनीचा काढा प्यायल्यास काय होईल?, जाणून घ्या रेसिपी

हिवाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती खूपच कमकुवत होते. अशा परिस्थितीत आपण आपल्या आहारात अशा खाद्यपदार्थांचा समावेश केला पाहिजे ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल. दालचिनी आणि आल्यापासून बनवलेला काढा हा असाच एक नैसर्गिक उपाय आहे. जो केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवत नाही तर खोकला, सर्दी आणि ताप यापासून आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करतो. पाहूया काढा बनवण्याची रेसिपी.

साहित्य :

दोन कप पाणी

एक इंच किसलेले आले

एक दालचिनीची काडी

काळी मिरी चार ते पाच

एक टीस्पून मध

लिंबाचा रस चवीनुसार

कृती :

सर्वप्रथम एका पॅनमध्ये पाणी उकळवून घ्या.

त्यानंतर उकळत्या पाण्यात किसलेले आले, दालचिनीची काडी आणि काळी मिरी घाला.

नंतर मंद आचेवर पाच ते सात मिनिटे उकळू द्या.

यानंतर गॅस बंद करून काढा गाळून घ्या. काढा कोमट झाल्यास त्यात मध आणि लिंबाचा रस घाला.

या काढ्याचे सेवन तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा करू शकता.

काढा पिण्याचे फायदे:

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

आले आणि दालचिनी या दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आले आणि दालचिनीचा काढा नियमितपणे पिल्यास संसर्ग आणि रोगांपासून संरक्षण होते. यामुळे कफासह खोकला वाढण्यास प्रतिबंध होतो. त्यामुळे श्वसनाच्या संसर्गापासूनही आराम मिळतो.

कफासाठी फायदेशीर

जेव्हा तुम्हाला कफ आणि खोकला येतो तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम श्वसन प्रणालीमध्ये संसर्ग होतो. आले आणि दालचिनीचा काढा कफ दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. श्लेशमा दूर करण्यासाठी आणि बाहेर काढण्यासाठी हा काढा फायदेशीर आहे. यामुळे वायू मार्ग साफ होतो आणि कफ दूर होतो.

दाहक विरोधी गुणधर्म

पाण्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात. आल्याबरोबर दालचिनी घेतल्यास श्वसन मार्गातील जळजळ कमी होण्यास मदत होते. यामुळे कफ कमी होण्यास मदत होते आणि श्वास घेण्याचा त्रास होत नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;