10 की 45 मिनिटे? किती वेळ चालणे आहे अधिक फायदेशीर

10 की 45 मिनिटे? किती वेळ चालणे आहे अधिक फायदेशीर

आजच्या काळात शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी आपण व्यायामाचे अनेक प्रकार करत असतो. पण सर्वात सोपा मार्ग म्हणजे जॉगिंग आणि चालणे. जे तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मध्ये देखील करू शकता. अश्यातच जेव्हा आपण अगदी सोपा आणि सोयीस्कर व्यायाम थोडा वेळ केला तरी आपल्या शरीरातील कॅलरी बर्न होत नाहीत. त्यातच तुम्ही जर काही मिनिटे वॉकिंग केल्याने तुम्ही अगदी फिट राहू शकता. यातच चला जाणून घेऊया १० मिनिटे चालणे किंवा ४५ मिनिटे चालणे कोणते चांगले?

१० मिनिट चालण्याचे फायदे

तुमचे शरीर निरोगी राहण्यासाठी तुम्ही दररोज १० मिनिट चालायला जावं,  कारण हा सर्वात सोपा आणि जी व्यस्त वेळापत्रकात होणार प्रकार आहे. एकाच ठिकाणी केवळ १०मिनिटे जॉगिंग केल्याने एखादी व्यक्ती त्यांचे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली बऱ्याच प्रमाणात सुधारू शकते. हे एक नॉन-स्टॉप मोशन वर्कआउट आहे, जे हृदयगती वाढवते आणि ऑक्सिजनचे सेवन वाढवते. १० मिनिटांच्या व्यायामाने सुमारे ८० ते १२० कॅलरी कमी केल्या जाऊ शकतात.

४५ मिनिटे चालण्याचे फायदे

जर तुम्ही ४५ मिनिटे चालत असाल तर यामुळे तुमच्या शरीरातील १५०-२०० कॅलरी कमी होतात. कार्डिओसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. जॉगिंगपेक्षा चालणे सोपे आहे, जे सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहे. चालण्याने बीपी कमी होतो, कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते आणि हृदयाशी संबंधित आजार दूर राहतात. अशावेळी जर तुम्ही रोज चालत असाल तर तुमचं शरीर निरोगी राहतं.

 तुमच्यासाठी काय चांगलं ?

१. स्नायू सैल करण्यासाठी १० मिनिटांच्या वॉर्म-अप वॉकसह सुरुवात करा.

२. हृदयाचा वेग वाढवण्यासाठी १० मिनिटे जॉगिंग करणे चांगले मानले जाते.

३. त्यानंतर ४५ मिनिटे चालल्याने शरीर थंड होते आणि कॅलरी बर्न होतात.

४. ज्या व्यक्तीला निरोगी राहायचे आहे, त्याच्यासाठी ४५ मिनिटे चालणे फायदेशीर ठरू शकते. तसेच यामुळे स्टॅमिना वाढतो आणि तुम्ही स्वत:ला मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवू शकता

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;