वयाच्या 59 वर्षी या आजीचे तासाभरात 1575 पुश-अप्स, बनवले वर्ल्ड रिकॉर्ड

वयाच्या 59 वर्षी या आजीचे तासाभरात 1575 पुश-अप्स, बनवले वर्ल्ड रिकॉर्ड

चांगल्या आरोग्यासाठी नियमित व्यायम करणे महत्वाचे असते. परंतु चाळीशीनंतर चालणे, वॉर्म अप, योगासन अशी व्यायम अनेक जण करतात. परंतु वयाच्या साठीत कोणी 1,575 पुश-अप्स तासाभरात काढू शकतो का? यावर तुमचे उत्तर नाही असणार आहे. परंतु कॅनडामधील 59 वर्षीय डोनाजीन वाइल्ड यांनी हा विक्रम केला आहे. त्यांचे वय केवळ संख्येने वाढले आहे. परंतु त्यांचे शरीर युवकांना मागे टाकणारे आहे. डोनाजीन यांनी आजी होण्याच्या वयात गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये नाव नोंदवले आहे. त्यांनी तासाभरात 1,575 पुश-अप करण्याचा विक्रम केला आहे.

मार्चनंतर हा दुसरा विक्रम

डोनाजीन यांनी मार्चमध्ये केलेल्या त्यांच्या मागील विक्रमानंतर आता नवीन विक्रम केला आहे. मार्च महिन्यात त्यांनी 4 तास 30 मिनिटे आणि 11 सेकंद प्लँक स्थितीत राहून जगाला चकित केले होते. आता पुश-अपसाठी विशेष मानके पाळली गेली. प्रत्येक पुश-अपसाठी कोपर 90 अंशांपर्यंत वाकवणे आणि नंतर हात पूर्णपणे सरळ करणे आवश्यक आहे. गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्समधील दोन पंचांनी त्याची गणना केली. त्यानंतर त्यांचे पुश-अप स्कोअरबोर्डवर सतत अद्यवतही केले.

असा केला विक्रम

डोनाजीन यांनी पहिल्या 20 मिनिटांत 620 पुश-अप मारले. त्यानंतर त्यांनी 15 मिनिटांसाठी 20 आणि 5 पुश-अपचे सेट पुन्हा केले. सरतेशेवटी त्यांनी प्रति सेट सरासरी 10 पुश-अपसह जुना विक्रम मोडला. डोनाजीन यांची 11 आणि 12 वर्षांची नातवंडे यांनी त्यांना त्यासाठी सतत प्रोत्साहन दिले. त्यांचा विक्रम पूर्ण होताच त्या नातवंडानी त्यांच्या नावाचा जयजयकार केली. डोनाजीन यांनी सांगितले की, मला माझे अश्रू थांबवून माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागले. मला वाटले की मी आणखी पुश-अप करू शकतो.

पुश-अप ही युवकांसाठी चांगला व्यायम आहे. परंतु वरिष्ठ नागरिक हा प्रकार फारसा करत नाही. पुश-अपमुळे चेस्ट, कांधे आणि ट्रायसेप्सचे मसल्स मजबूत होतात. तसेच कोर मसल्स सक्रीय असतात. त्यामुळे शरीरातील बॅलेंस चांगला राहतो. ह्रदयाची स्पंदने वाढतात. आरोग्यात सुधारणा होते. आता डोनाजीन वाइल्ड यांनी कोणत्याही गोष्टीला वयाची मर्यादा नसते, हे सिद्ध करुन दिले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;