हिवाळ्यात राहा निरोगी; बनवा गुळाच्या या स्वादिष्ट रेसिपी

हिवाळ्यात राहा निरोगी; बनवा गुळाच्या या स्वादिष्ट रेसिपी

गुळाचे कार्य फक्त जेवणाची चव वाढवणे हेच नसून तर गुळ आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. गुळामध्ये प्रथिने, पोटॅशियम, हेल्दी फॅट, फॉस्फरस, मॅग्नेशियम, लोह, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम यासारख्या पोषक तत्त्वांचा समावेश आहे. गूळ हा गरम असतो त्यामुळे हिवाळ्यात त्याचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. जाणून घेऊया गुळापासून बनवलेल्या काही स्वादिष्ट रेसिपीज ज्या थंडीच्या काळात खाल्ल्या जाऊ शकतात.

तिळगुळाचे लाडू :
साहित्य

१ वाटी गूळ
२ कप भाजलेले तीळ
१ चमचा तूप
१ टीस्पून वेलची पावडर
१ टेबलस्पून बारीक वाटलेले बदाम
१ टेबलस्पून बारीक वाटलेले काजू

कृती :

कढईमध्ये तूप गरम करून त्यात गूळ घालून वितळू द्या. यानंतर त्यामध्ये वेलची पावडर बदाम, काजू आणि भाजलेले तीळ मिक्स करा. हे मिश्रण थंड झाल्यावर त्याचे लाडू बांधून घ्या.

शेंगदाणा चिक्की :

साहित्य

२५ ग्रॅम लोणी किंवा तूप
२५० ग्रॅम शेंगदाणे
२०० ग्रॅम गूळ
१/२ कप पाणी

कृती :

सर्वप्रथम शेंगदाणे भाजून बारीक करून घ्या. पाक तयार करण्यासाठी पाण्यात गुळ घालून पाक घट्ट होईपर्यंत शिजवा. शिजल्यानंतर ट्रे मध्ये पाक टाका आणि त्यावर शेंगदाणे टाका. यानंतर हे मिश्रण कापून एका बाजूला ठेवा.

गोड शेव :

साहित्य

२०० ग्रॅम बेसन
२५० ग्रॅम गूळ
२ चमचे तेल
१ चमचा तूप

कृती :

बेसन पिठामध्ये दोन थेंब तेल आणि थोडे पाणी घालून मळून घ्या. आता कढईत तेल घालून बेसन पिठाला शेवचा आकार देऊन तळून घ्या. दुसरीकडे पाण्यात गुळ मिसळून पाक तयार करा. तयार पाक शेव वर टाका. गोड शेव खाण्यासाठी तयार आहे.

गुळाची खीर:

साहित्य

१ कप भाजलेले तांदूळ
2 लिटर दूध
१०० ग्रॅम गूळ
४ हिरव्या वेलची
१/२ कप ड्राय फ्रूट्स
१ टीस्पून चारोळी

सर्वप्रथम एका पातेल्यात दूध आणि भाजलेले तांदूळ शिजवायला ठेवा. दूध आणि तांदूळ शिजल्यानंतर वेलची आणि चारोळी मध्यम आचेवर शिजवून घ्या. नंतर यात गुळाचे तुकडे घालून खीर गूळ वितळेपर्यंत उकळवा. शेवटी ड्रायफ्रूट्स घालून खीरचा आस्वाद घ्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;